9 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बारामतीत पोलीस हवालदारावर कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 15, 2023

9 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बारामतीत पोलीस हवालदारावर कारवाई..

9 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बारामतीत पोलीस हवालदारावर कारवाई..
                                                          बारामती:- नुकताच बारामती मध्ये लाच घेतल्याचा ठपका ठेवत कारवाई झाल्याची बातमी आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,9 हजार रूपयाच्या लाचेची मागणी
केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गोत्यात आला आहे. त्यांच्याविरूध्द पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रदीप दत्तात्रय काळे (44) यांच्याविरूध्द बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्याविरूध्द बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात न्यायालयाने तक्रारदारास पोलिस ठाण्यात हजेरी देण्याबाबत आदेश दिले होते.
त्या हजेरीची नोंद घेण्यासाठी व गुन्हयाच्या तपासात तक्रारदाराच्या बाजुने मदत करण्यासाठी पोलिस हवालदार प्रदीप काळे यांनी लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.तक्रारीची पडताळणी केली असता पोलिस हवालदार काळे हे 9 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक अमोल तांबे ,अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment