सोमवार पासून सर्व कंत्राटी कामगारांचे बारामती नगर परिषदेसमोर आमरण उपोषण... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 12, 2023

सोमवार पासून सर्व कंत्राटी कामगारांचे बारामती नगर परिषदेसमोर आमरण उपोषण...

सोमवार  पासून सर्व कंत्राटी कामगारांचे बारामती नगर परिषदेसमोर आमरण उपोषण...                                                                    बारामती(संतोष जाधव):-मा. मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद बारामती यांना दिलेल्या लेखी निवेदनात कामगारांनी म्हंटले की, दिनांक १६/०९/२०२२ रोजी सर्व कंत्राटी कामगारांनी दिलेले निवेदनात मागणी केले की सर्व कंत्राटी सफाई कामगारांच्या हक्काच्या वेतन व सवलती मिळवण्यासाठी बारामती नगर परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे तरी दिनांक १३ मार्च २०२३ते मागण्या पूर्ण होई पर्यंत आम्ही दिलेल्या विषययास अनुसरून आम्ही सर्व कंत्राटी सफाई कामगार व इतर सर्व कामगारांनी नमूद संदर्भ अनुसरून खालील नमूद मागण्यासाठी बारामती नगर परिषद समोर दिनांक १३ मार्च पासून आमरण उपोषण करीत आहोत.खालील प्रमाणे मागण्या
१) कामावरती येत असताना मयत (कृष्णा दिलीप मोरे)या कामगारांच्या वारसांना विमा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या तर्फे त्वरित क्लेम करून देणे.(डायरेक्ट ऑफ इन्शुरन्स महाराष्ट्र स्टेट स्टेट मुंबई )
२) किमान वेतन अधिनियम 1948 या नियमाचे पूर्ण पालन करून प्रत्येक कामगारांचा पगार किमान वेतन कायद्याप्रमाणे बँक खात्यात झाला पाहिजे व काम सुरू केले पासून ते आत्ता पर्यंत चा फरक मिळाला पहिजे.
३) भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसारच दर महा पगाराच्या पीएफ(१२.५०%) कट करणे व पीएफ खात्यावर महिन्याला जमा करणे व
काम सुरू केले पासून ते आत्ता पर्यंत चा
(पी एफ ) फरक मिळाला पहिजे.
४) शासन निर्णयाचे परिपत्रक क्रमांक
२०२२०७१३१५४३२३३१५०५ नुसार प्रत्येक
कामगाराचा स्वतंत्ररित्या विमा काढणे व एस.
आय . सी. च्या नियमानुसार सर्व कामगारांना एसआयसी कार्ड त्वरित उपलब्ध करणे.
५) कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम 1970 हा कायदा शासन निर्णय परिपत्रक क्रमांक २०१४०६४०१४११७४६७७० नसेल त्वरित लागू करून काटेकोरपणे पालन करणे,
६) महिला कामगारांसाठी महिला सुपरवायजर ची नेमणूक करण्यात यावी. व सर्व कामगारांची मेडिकल चेकअप करण्यात यावी.
७) कंत्राटदराने सर्व कामगारांबरोबर
एग्रीमेंट करून सर्व कामगारांना
ओळखपत्र,नियुक्तीपत्र देणे.
८) सर्व कामगारांना पगारी
साप्ताहिक सुट्टी मिळवी.
कामाचे तास ठरविणे व पेमेंट
स्लीप मिळावी.
९) सर्व कामगारांना स्वतःच्या
तक्रारीसाठी सूचनापेटी उपलब्ध
करून देणे व त्याची पोच मिळणे.तसेच सर्व साधनसामग्री वेळोवेळी उपलब्ध करून देणे.तसेच या वरील सर्व मागण्या पूर्णपणे मान्य करण्यात याव्यात व लेखी हमीपत्र मिळावे अन्यथा आम्ही सर्व कामगार दि.13 मार्च 2023 रोजी सोमवारपासून ते बेमुदत काम बंद करून आमच्या मागण्या होईपर्यंत आमरण उपोषण करत आहोत.सदर निवेदन दाखल झाल्यापासून उपोषण पूर्ण होईपर्यंत आमच्या कोणत्याही कामगारास कामावरून कमी करणे
जीवित किंवा वित्तहानी झाल्यास अथवा कोणताही विचित्र अनुचित प्रकार घडल्यास याची सर्व जबाबदारी प्रशासन व एन डी एन डी के हॉस्पिटलिटी एलएलपी चे ठेकेदार नितीन दशरथ कदम यांची राहील.बारामती कंत्राटी कामगार युनियन तर्फे आमरण उपोषण करणारे सर्व कामगार यांचे पत्र देण्यात आले.तर सोमवार पासून सर्व कंत्राटी कामगार बारामती नगर परिषदेसमोर आमरण उपोषणासाठी बसणार असून सोमवार पासून सर्वच घंटा गाड्या बंद राहणार आहेत असा इशारा देण्यात आला.

No comments:

Post a Comment