बुरुड गल्ली परिसरात प्लेवर ब्लॉक बसविल्याने स्थानिक नागरिकांकडून सुनिल सस्ते यांचा जाहीर सत्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 12, 2023

बुरुड गल्ली परिसरात प्लेवर ब्लॉक बसविल्याने स्थानिक नागरिकांकडून सुनिल सस्ते यांचा जाहीर सत्कार...

बुरुड गल्ली परिसरात प्लेवर ब्लॉक बसविल्याने स्थानिक नागरिकांकडून सुनिल सस्ते यांचा जाहीर सत्कार... 

बारामती/प्रतिनिधी:- बारामती शहरातील बुरुड गल्ली ‌येथील पांडकर वाड्यामध्ये प्लेवर ब्लॉक चे काम करून दिल्याबद्दल बारामतीचे कार्यक्षम नगरसेवक सुनील दादासाहेब सस्ते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.ज्येष्ठ नागरिक माननीय अशोक काका पांडकर यांच्या हस्ते सस्ते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नगरपरिषद चे कॉन्ट्रॅक्टर पवार यांचा देखील सत्कार करण्यात आला. 

सस्ते यांनी नगरपरिषद मध्ये पाठपुरावा करून काम करून घेतले.त्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक विभागात असे नगरसेवक तयार व्हावे अशी इच्छा श्री सोमाणी शेठ यांनी आभार प्रदर्शन करताना व्यक्त केली.तर सस्ते म्हणाले की अशा सत्काराने माझे काम करण्याची ऊर्जा डबल होते.

दरम्यान,या कार्यक्रमास शाकीर बागवान,अतुल भागवत,विकास गुळवे,योगेश पांडकर ईदाते,आशिष गुळवे,प्रकाश रत्नपारखी,धन्यकुमार पांडकर यांच्यासह सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पांडकर यांनी केले.

No comments:

Post a Comment