*वंचित बहुजन आघाडी लासूर्णे शाखेचे उद्घाटन संपन्न * - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, March 12, 2023

*वंचित बहुजन आघाडी लासूर्णे शाखेचे उद्घाटन संपन्न *

*वंचित बहुजन आघाडी लासूर्णे  शाखेचे उद्घाटन  संपन्न *
   लासूर्णे:-  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व पुणे जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण सर यांच्या आदशाने गाव तिथे शाखा अंतर्गत  इंदापूर तालुक्यामध्ये लासुर्णे या गावामध्ये वंचित बहुजन आघाडी शाखे च उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले,
राष्ट्रवादी आणि भाजप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मत पुणे जिल्हा अध्यक्ष राजकुमार यांनी व्यक्त केले बोलताना ते पुढे म्हणाले भाजपला देशामध्ये किंवा राज्यामध्ये कुठेही पाठिंब्याची गरज असेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलेला आहे 2014 मध्ये भाजपला महाराष्ट्र मध्ये न मागता पाठिंबा दिला होता, 2016 मध्ये पुण्यात शुगर केन व्हॅल्यूशन विजन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले तेव्हा मोदी म्हणाले शरद पवारांनी मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं, त्याचप्रमाणे 23 नोव्हेंबर 2019 ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाठीचा शपथविधी घेऊन महाराष्ट्राला धक्काच दिला होता, तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार हे भाजपच्या शिष्य शेलारं सोबत युती करूनच झाले होते आणि नागालँड मध्ये बीजेपीला राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा देऊन राष्ट्रवादी हीच बीजेपी ची बी टीम आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.शिंदे फडणवीस सरकारने तुकाराम बिजाचं अवचित्य साधून महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला परंतु तुकाराम महाराज आज असते तर त्यांनी हा अर्थसंकल्प अरबी समुद्रामध्ये बुडवला असता कारण या अर्थसंकल्पामध्ये फक्त अफवांचा भडीमार असून राज्यातील जनतेच्या हिताच्या गोष्टी नाहीत असे परखड मत जिल्हाध्यक्ष राज कुमार यांनी व्यक्त केले तसेच महासचिव मंगलदास निकाळजे यांनी वंचित बहुजन आघाडी चा जाहीरनामा वंचित बहुजन आघाडीतील शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये बुथ बांधणी करून त्या त्या गावांमध्ये वंचित बहुजन आघाडी मजबूत करावी असे मत व्यक्त केले सूत्रसंचालन इंदापूर तालुकाध्यक्ष मनोज साबळे यांनी केले कार्यक्रमास जिल्हा संपर्कप्रमुख वैभव कांबळे, संघटक सुजय रणदिवे किरण मिसाळ, सहसचिव गोविंद कांबळे ॲड. जुगल खरात, तालुका महासचिव गौतम कांबळे, राहुल कांबळे, सिद्धार्थ पारधे, रमजान सय्यद, रमेश जाधव, संजय धीमधिमे, जमील कुरेशी, रविकांत काळे, राजेंद्र जगताप, स्वप्निल चव्हाण, बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप, माळेगाव शाखेचे उपाध्यक्ष रमेश शिंदे, शिवनगर शाखा अध्यक्ष शंकर राणे, तसेच लासुर्णे शाखेचे शाखाप्रमुख विश्वास लोंढे, शाखा अध्यक्ष विजय लोंढे, संजय चव्हाण, सुभाष लोंढे व पदाधिकारी व कळस शेळगाव बोरी माळेगाव शाखेचे असंख्य पदाधिकारी हजर होते.

No comments:

Post a Comment