बापरे..गांजाचा धूर नाका-तोंडात सोडून केला तरुणीवर केला लैंगिक अत्याचार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 23, 2023

बापरे..गांजाचा धूर नाका-तोंडात सोडून केला तरुणीवर केला लैंगिक अत्याचार..

बापरे..गांजाचा धूर  नाका-तोंडात सोडून केला तरुणीवर केला लैंगिक अत्याचार..                            पुणे :- मुलींवर अत्याचारात भयंकर वाढ होत असताना काहींची दखल घेतली जाते तर काहींची दखल घेऊन कारवाई केली जाते अश्या अनेक धक्कादायक घटना पुढे येत आहे की त्या ऐकून धक्का बसेल अशीच एक धक्कादायक घटना घडली ती ही पुण्यात याबाबत मिळालेली माहिती अशी की, तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केली. पण, तिने भांडण झाल्याच्या रागातून नकार दिला. त्यावेळी तरुणाने तिचे हात-पाय कपड्याने बांधून गांजा ओढून त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.श्रवण राजेंद्र अंकुशे (रा. उंड्री) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय पीडित तरूणीने तक्रार दिली आहे. आरोपी आणि पीडिता या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण, श्रवणचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झालेले होते. श्रवण याने घराचा दरवाजा लावून पीडित तरूणीकडे शरीरसुखाची मागणी केली.
तरूणीने नकार दिला. मात्र, त्यानंतर देखील श्रवणने पीडित तरूणीचे हात कपड्याने बांधून गांजा ओढून त्याचा धूर तिच्या नाका-तोंडात सोडला. तसेच तिच्या डोक्यात आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, गांजाचा धूर नाकात गेल्याने तरूणीला गुंगी आली. अंकुशेने तिच्या इच्छेविरूध्द बलात्कार केला.
या गंभीर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तोरगल करीत आहेत.

No comments:

Post a Comment