दिवसाढवळ्या हत्याराचा धाक दाखवुन 47 लाख लुटले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 23, 2023

दिवसाढवळ्या हत्याराचा धाक दाखवुन 47 लाख लुटले..

दिवसाढवळ्या हत्याराचा धाक दाखवुन 47 लाख लुटले..                                                               पुणे:- पुण्यात गुन्हेगारी वाढतच चालली असल्याचे मागील काही महिन्यात घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे, नुकताच पुण्यातील नाना पेठेत भरदिवसा हत्याराचा धाक दाखवुन आणि झटापट करून व्यापाऱ्याकडील 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 चेक मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी जबरदस्तीने लुटले आहेत,दिवसाढवळया आणि गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान, घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. यासंदर्भात मंगलपूरी भिमकपूरी गोस्वामी (55, रा.मंगळवार पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, गोस्वामी हे पन्ना एजन्सी या दुकानात नोकरी करतात. दुकानातील
व्यवसायाची एकुण रक्कम 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 हे एका पिवळसर रंगाच्या बॅगमध्ये घेऊन गोस्वामी हे अॅक्टीव्हावरून घेऊन जात होते. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर 395 ब येथील सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना काळया रंगाच्या दुचाकीने
त्यांना मागुन धक्का दिला. चोरटयांनी त्यांची गाडी फिर्यादीच्या समोर आडवी घालून त्यांना हाताने मारहाण केली. लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन गोस्वामी यांच्याकडील बॅग आणि त्यामध्ये असलेली रोख रक्कम आणि चेक हे जबरदस्तीने लुटले. काही क्षणातच चोरटयांनी तेथून पळ काढला. झालेल्या मारहाणीत गोस्वामी यांच्या उजव्या हाताला खरचटले असुन पाठीला मुका मार लागला आहे.त्यांना ससून रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेतील अधिकारी  व
समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.दिवसाढवळया नाना पेठेत अगदी गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment