बारामतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी दौरा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 10, 2023

बारामतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी दौरा..

बारामतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी दौरा..
बारामती:- शनिवारी (दि. 11)केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी बारामतीच्या
दौऱ्यावर येत आहेत. येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या भारतातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट - पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र) सोबतच एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरीचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते
होणार आहे.या वेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक
इम्प्रूव्हमेंट किंवा पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र हा देशी गोवंश आणि म्हैस यामधील दूध उत्पादन वाढीचा उद्देश घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजना व टाटा ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेला प्रकल्प आहे.आज भारत हा देश जगामध्ये सर्वांत जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे.परंतु, देशाची लोकसंख्या आणि त्याचबरोबर अन्नाची परंतु, देशाची लोकसंख्या आणि त्याचबरोबर अन्नाची मागणी वाढत जाणार आहे. जरी दूध उत्पादनात भारत अग्रेसर असला, तरी सरासरी भारतीय गाईचे दूध देण्याचे प्रमाण प्रतिदिन प्रतिगाय 6 ते 8 लिटर एवढेच आहे. भविष्यकाळामध्ये भारतासमोर अन्नाची समस्या
निर्माण होणार आहे. मानवाच्या अन्नामध्ये प्रथिनासाठी दूध हा प्रमुख स्त्रोत मानला जातो. त्यामुळे सद्यपरिस्थितीत संकरित गाईसोबतच देशी गाई आणि म्हशींमधील दुधाचे उत्पादन वाढवणे गरजेचे ठरते.त्यासाठी हा प्रकल्प मोठी भूमिका बजावणार असल्याचे मत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.नीलेश नलावडे, प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. नीलेश नलावडे व प्रकल्प प्रमुख डॉ. धनंजय भोईटे यांनी व्यक्त
केले.शनिवारी दुपारी साडेबारा वाजता गडकरी सेंटर फॉर एक्सलन्सचे उद्घाटन करून डेअरी प्रकल्पाला भेट देतील. त्यानंतर अटल इन्क्युबेशन सेंटर येथे नव उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र व राजीव गांधी सायन्स सेंटरला ते भेट देतील. दुपारी सव्वा तीन वाजता अप्पासाहेब पवार सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सव्वाचार वाजता ते विद्या प्रतिष्ठानला भेट देतील. सव्वापाच वाजता ते बारामतीतून विमानाने
परतणार आहेत.

No comments:

Post a Comment