किळसवाणा धक्कादायक प्रकार..जादूटोण्यासाठी महिलेचे मासिक पाळीचे रक्त विकलं..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 10, 2023

किळसवाणा धक्कादायक प्रकार..जादूटोण्यासाठी महिलेचे मासिक पाळीचे रक्त विकलं..!

किळसवाणा धक्कादायक प्रकार..जादूटोण्यासाठी महिलेचे मासिक पाळीचे रक्त विकलं..!                                                                                                                 पुणे:- महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असताना क्रुरतेनचा कळस गाठला जातो ही चिंतेची बाब आहे नुकताच बीड मध्ये घडलेली घटनेची तक्रार पुण्यात देण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की, जादूटोण्यासाठी  महिलेचे मासिक पाळीचे रक्त 50 हजारांना विकले असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा
दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 27 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधीत महिला विश्रांतवाडी परिसरात राहायला आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा प्रेम विवाह  झाला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिला मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली.तिच्या मासिक पाळी दरम्यान सासरी मंडळी तिचे हात पाय बांधून ठेवत आणि कापसाने तिचे मासिक पाळीचे रक्त घेत. हे रक्त त्यांनी जादूटोण्यासाठी तब्बल 50 हजार रूपयांना विकले असल्याची माहिती समोर
आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही किळसवाणा प्रकार सुरू होता. अखेर तिने याबाबत आपल्या माहेरी सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार बीडमध्ये घडला आहे. त्यामुळे महिलेच्या
तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास तिकडे करण्यात येईल. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

No comments:

Post a Comment