3 हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई लाच लुचपतच्या जाळ्यात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 21, 2023

3 हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई लाच लुचपतच्या जाळ्यात..

3 हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई लाच लुचपतच्या जाळ्यात..                                            बारामती:- बारामती मध्ये लाचखोरी चे प्रमाण वाढत चालले की काय काही  बातम्या येत असतात,शासकीय कार्यलयात होत असलेली नागरिकांची तारांबळ त्यांची वेळेत न होणारी कामे,त्यामुळे नाईलाजाने आर्थिक देवाण घेवाण करून कामे मार्गी लावावी लागत असल्याचे नागरिक सांगतात, तर काही कार्यालयात व पोलीस स्टेशनमध्ये एजंट गिरी करणारे मुळे चांगले काम करणाऱ्या खात्याच नाव खराब होत असल्याचे दिसत आहे, अडलेला कोणी असेल तर त्याच लगेच अश्या एजंट कडे संपर्क होतो व त्यातून वरिष्ठांना काही द्यावे लागतील तुमचे कामे होतील म्हणून हजारो रुपये घेतले जातात याची जाणीव अधिकारी वर्गाला होते का नाही?हे वेळ आल्यावर कळते असो, याबाबत सविस्तर लवकरच प्रसिद्ध करणार आहोत पण नुकताच बारामती मध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले लोकसेवक- संतोष जगन्नाथ पवार, वय 39 पद - पो शिपाई, बारामती शहर पो ठाणे,पुणे ग्रामीण.यांच्या विरोधात पडताळणी व  सापळा रचून दि:-  21/04/2023 रोजी 3,150/-लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3,000/- लाच स्वीकारली असल्याने कारवाई करण्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी की,यातील तक्रारदार यांनी पोलीस कंट्रोल रूम येथे तक्रार केली होती, सदर तक्रारीचा फॉलोअप घेतला म्हणून त्याचा दंड म्हणून व पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे रु 3,150/ - लाच मागणी करुन तडजोडीअंती रु 3,000 / -रु स्विकारण्याचे मान्य करुन 3,000 / -रु लाच रक्कम स्विकारली.असता प्रवीण निंबाळकर - पोलिस निरीक्षक,पो शि.सुराडकर, चालक पो ना गोसावी,अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांनी सापळा रचला होता, तसेच श्री.अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि,पुणे परिक्षेत्र. श्री.सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे.यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आले.

No comments:

Post a Comment