पुणे जिल्ह्यात मद्यविक्रीत मोठी वाढ,राज्याला मिळाला दोन हजार कोटींचा महसुल;तर मूळ मालकांवर कधी होणार कारवाई? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, April 20, 2023

पुणे जिल्ह्यात मद्यविक्रीत मोठी वाढ,राज्याला मिळाला दोन हजार कोटींचा महसुल;तर मूळ मालकांवर कधी होणार कारवाई?

पुणे जिल्ह्यात मद्यविक्रीत मोठी वाढ,राज्याला मिळाला दोन हजार कोटींचा महसुल;तर मूळ मालकांवर कधी होणार कारवाई?
पुणे :-हजारो कोटी रुपये महसूल मिळाल्याने पुणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे,अश्या  प्रकारे अवैध दारू विक्री करणाऱ्याला ही दारू सप्लाय करणाऱ्या मूळ मालकांवर कारवाई का होत नाही हा सर्व सामान्य नागरिकांना पडलेला कोंड कधी सुटणार आहे असा सवाल विचारला जात आहे, निरा, जेजुरी, बारामती या भागातून ही दारू अवैध विक्री करणाऱ्या छोट्या व्यवसायीकाला सप्लाय केली जाते याकडे कधी लक्ष जाईल, या सप्लाय करणाऱ्या मूळ मालकांवर कारवाई कधी करणार ही कारवाई लवकर करावी यासाठी  बारामती तालुक्यातील सामाजिक, राजकीय महिला मंडळ लवकरच आंदोलन करणार असल्याचे कळाले, नुकताच मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात २०२१-२२ या वर्षाच्या तुलनेत या
गेल्या वर्षी (२०२२-२३) देशी मद्याच्या विक्रीत तब्बल १५ टक्के, विदेशी मद्यविक्रीत २३ टक्के आणि बिअर विक्रीत ५१ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय वाइन विक्रीमध्ये ३१ टक्के इतकी वाढ झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाला सरत्या आर्थिक वर्षात मिळालेल्या महसूलावरून ही माहिती समोर आली आहे.गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) २ हजार २२४.८२ कोटी रुपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला
मिळाला. अवैधरित्या गोवा राज्यातून उत्पादन शुल्क  बुडवून महाराष्ट्रात वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात २१ गुन्हे दाखल करून ४२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये १९ वाहने जप्त करून  आठ कोटी ६४ लाख ४५ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैधरित्या ढाब्यांवर मद्य सेवन केल्याप्रकरणी १३४ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून न्यायालयाकडून २९० आरोपींना
दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
त्यांच्याकडून दंडापोटी ३ लाख ९६ हजार ९००
रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी दिली.
महसूल (रुपयांत)• १,८५५.८२ कोटी-२०२१-२२
२,२२४.८२ कोटी - २०२२-२३(आकडेवारी : राज्य उत्पादन शुल्क विभाग)उत्पादन शुल्क पुणे विभाग (२०२२-२३आकडेवारी)• २ हजार ६५८ - दाखल गुन्हे • २ हजार ९४७ - अटकेतील आरोपी
• १८ कोटी १४ लाख १९ हजार १७७ - जप्त
मुद्देमाल (रुपये) ●तक्रारीसाठी संपर्क क्रमांक
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्री यांबाबत यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार आहे.शहरासह जिल्ह्यात कोणत्याही नागरिकास अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ आणि दूरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही राजपूत यांनी केले.

No comments:

Post a Comment