बारामती पोलिसांना फेरतपास करून रिपोर्ट सादर करण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश;अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अट्रोसिटी प्रकरण... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 4, 2023

बारामती पोलिसांना फेरतपास करून रिपोर्ट सादर करण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश;अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अट्रोसिटी प्रकरण...

बारामती पोलिसांना फेरतपास करून रिपोर्ट सादर करण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश;अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अट्रोसिटी प्रकरण...                                                        बारामती :- फिल्म अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने एका मुलाखतीत एका अनुसूचित जाती विषयी चुकीचे वक्तव्य केलेले होते,त्यामुळे या जातीच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या याबाबत बारामती मधील सामाजिक कार्यकर्ते श्री विश्वास उद्धव लालबिगे यांनी ॲड.हेमचंद्र मोरे यांच्यामार्फत बारामती न्यायालयात ॲट्रोसिटी कायद्याखाली फिर्यादी दाखल केली होती,याबाबत अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी बारामती पोलिसांना सी.आर.पी.सी कलम २०२ अन्वये चौकशीचे आदेश दिले होते,परंतु बारामती पोलिसांनी न्यायालयात २०२ अन्वये दाखल केलेल्या रिपोर्ट मध्ये सोनाक्षी सिन्हा हिने त्या मुलाखतीत विशिष्ठ जातीचा उल्लेख केला आहे परंतु आरोपीने कोणताही गुन्हा केल्याचे दिसत नाही असे नमूद केले होते.या रिपोर्ट वर फिर्यादीचे वकील ॲड.हेमचंद्र मोरे यांनी आक्षेप घेतला व सोनाक्षी सिन्हा हीचा कोणताही जबाब न घेता तिने कोणत्याही हेतूने व कोणत्या भावनेने त्या विशिष्ठ अनुसूचित जाती विषयी वक्तव्य का केले हे पोलिस कसे ठरवू शकतात ? व तिचा कोणताही जबाब न घेता तिने केले वक्तव्य हे गुन्हा होत नाही हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला ? पोलिस सोनाक्षी सिन्हा हिचे वकील असल्यासारखे तिने गुन्हा केल्याचे दिसत नाही असे कसे म्हणू शकतात ? घाणेरड्या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून या विशिष्ठ जातीच्या शब्दाचा उल्लेख केला असताना पोलिस सोनाक्षी सिन्हा हीचा जबाब न घेता तीने जातीचा उल्लेख केला आहे  परंतु गुन्हा केल्याचे दिसत नाही असा रिपोर्ट पोलिस कसे देऊ शकतात ? असे अनेक प्रश्न न्यायलयात उपस्थित करून ॲड.हेमचंद्र मोरे यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीचा जबाब घेऊन पुन्हा या प्रकरणाची सी.आर.पी.सी कलम 202 अन्वये चौकशी करून तपास करून पुन्हा रिपोर्ट सादर करावा असा आदेश बारामती पोलिसांना व संबंधित तपासी अधिकारी यांना व्हावा अशी मागणी न्यायालयाकडे केलेली होती. दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी बारामती येथील मे.अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी ॲड.हेमचंद्र मोरे यांची मागणी मान्य करून बारामती पोलिसांना ( तपासी अधिकारी ) यांना सदरहू प्रकरणाची सी.आर.पी.सी कलम 202 अन्वये पुन्हा चौकशी व तपास करून दिनांक 31/5/2023 रोजी व त्यापूर्वी रिपोर्ट न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

No comments:

Post a Comment