धक्कादायक...तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मैत्री करून मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल;तर बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 27, 2023

धक्कादायक...तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मैत्री करून मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल;तर बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप..

धक्कादायक...तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत मैत्री करून  मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल;तर बदनामीची धमकी देऊन 1 लाख उकळल्याचा हवालदाराचा आरोप..
पुणे:- महिला अत्याचारात वाढ होत असताना तक्रारी वाढत असून अनेक ठिकाणी तक्रार देण्यासाठी गेल्यास वेगळंच प्रकरणे समोर असल्याचे दिसत असून अनेक ठिकाणी मैत्रीचं रूपांतर अनैतिक संबंधात होते आणि शेवटी काही वाद झाल्यास बलात्कार सारखा गुन्हा दाखल होतो तर काही वेळा असह्य महिलेचा गैरफायदा घेऊन खोटी आश्वासन देऊन तर काही वेळा दबाव टाकून बलात्काराच्या घटना घडल्या असल्याचे मिळालेल्या माहितीनुसार कळते,नुकताच मिळालेल्या माहिती नुसार पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलीस हवालदाराने मैत्री केली त्यानंतर मुलाला व पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचा गुन्हा चंदननगर पोलीस ठाण्यात  दाखल झाला आहे.
त्याच्या विरुद्ध हवालदाराने तक्रार दिली आहे.
त्यात बलात्काराचा खोटा अर्ज देऊन बदनामी करण्याची धमकी देऊन १ लाख रुपये खंडणी घेतल्याचा आरोप केला आहे.पोलीस हवालदार राहुल अशोक मद्देल(वय ४२, रा. नाना पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याची नाव आहे. हवालदार राहुल मद्देल हा सध्या हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते ८ डिसेबर २०२१ दरम्यान घडला आहे. याबाबत एका ४० वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २२९/२३)
दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी या शिवराणा प्रताप पोलीस चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. तेथे राहुल मद्देल हा ड्युटीवर होता. त्याने फिर्यादीसोबत ओळख करुन मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या मुलास व पतीस खोट्या गुन्ह्यात
अडकविण्याची भिती दाखवून फिर्यादीला खराडी येथील लॉजमध्ये तसेच इतर ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. तसेच
फिर्यादीकडून वारंवार पैसे घेतले आहेत.
फिर्यादी यांची समाजात बदनामी केली आहे.
या प्रकरणील पोलीस उपनिरीक्षक मुळुक
तपास करत आहेत.याविरोधात मुद्देल याने खंडणीची फिर्याद (गु. रजि. नं. २२८ / २३) दिली
आहे.त्यानुसार पोलिसांनी महिला, तिचा पती व
आणखी एकावर खंडणीचा गुन्हा दाखल केला
आहे.हा प्रकार विडी कामगार वसाहतीत २०
जानेवारी, २१ जानेवारी व २२ मे २०२३ रोजी
घडला आहे.महिलेने फिर्यादीशी ओळख वाढवून मैत्री केली.त्यानंतर घर खरेदी व इतर कारणासाठी वेळोवेळी २ लाख ३५ हजार
रुपये घेतले. फिर्यादी यांनी पैसे परत मागितले,
असता फिर्यादीविरुद्ध महिलेने बलात्काराचा
खोटा तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची, बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच नोकरी
घालवण्याची धमकी देऊन फिर्यादीकडून १ लाख रुपये गुगल पेद्वारे घेतले.त्यानंतर पुन्हा फिर्यादीविरुद्ध तक्रार अर्ज करुन अर्ज परत घेण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत
आहेत.

No comments:

Post a Comment