बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे हरभरा खरेदी केंद्रावर १०२५ क्विंटल हरभरा खरेदी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 8, 2023

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे हरभरा खरेदी केंद्रावर १०२५ क्विंटल हरभरा खरेदी...


बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे हरभरा  खरेदी केंद्रावर १०२५ क्विंटल हरभरा खरेदी...
बारामती:- बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात यांत्रिक चाळणी येथे  हमीदरा नुसार नाफेड मार्फत मार्केटींग फेडरेशच्या वतीने  दि. ३/४/२०२३  पासुन सुरू असलेल्या चना (हरभरा) खरेदी केंद्रावर दि. २७/४/२०२३  अखेर नोंदणी केलेल्या  १०१ शेतक-यांचा  १०२५ क्विंटल हरभरा  खरेदी करणेत आला. नाफेड मार्फत सब एजंट म्हणुन निरा कॅनॉल संघ यांनी काम पाहिले. हरभरा खरेदी केंद्राची मुदत संपली आहे अशी माहिती माहिती प्रशासक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी दिली.  
प्रति क्विंटल रू.५,३३५/- या हमीदराने हरभरा खरेदी झाली असल्याने हरभ-यांची किंमत              रू. ५४.६८ लाख होत आहे. हमीदरा पेक्षा बाजार आवारातील हरभ-यांचे दर कमी असल्याने शेतक-यांना याचा आर्थिक फायदा झाला आहे, होत आहे. शासनाने सदर खरेदी केंद्राची नोंदणी मुदत वाढवुन पुन्हा  खरेदी केंद्र सुरू करावे  अशी मागणी शेतक-यांकडुन होत असल्याचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment