निरावागज मध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन..*शाखा अध्यक्ष पदी मा.प्रियांका देवकाते यांची निवड* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 10, 2023

निरावागज मध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन..*शाखा अध्यक्ष पदी मा.प्रियांका देवकाते यांची निवड*

निरावागज मध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन..
*शाखा अध्यक्ष पदी मा.प्रियांका देवकाते यांची निवड*

 बारामती:- बारामती तालुक्यातील निरावागज गावात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीयअध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्याच प्रमाणे यावर्षी देखील ढोल-ताशा वाजवून तसेच पेढे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.
         यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या शाखेच्या फलकाचे अनावरण वंचितचे जिल्हाध्यक्ष मा.राज कुमार सर यांच्या हस्ते करण्यात आले. शाखेच्या अध्यक्ष पदी मा.प्रियांका देवकाते यांची निवड करण्यात आली. त्यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य, वंचित वर्गासाठी सुरू असलेला त्यांचा लढा आणि त्यांची प्रत्येक विषयावर घेतलेली ठाम भुमिका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित मध्ये प्रवेश केला. सोबतच नालंदा विपश्यन प्रतिष्ठानच्या फलकाचे अनावरण देखील जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते येथे करण्यात आले. 
         यावेळी कार्यक्रमास वंचितचे जिल्हा महासचिव मा.मंगलदास निकाळजे, बारामती तालुकाध्यक्ष रामदास जगताप, संघटक आनंद जाधव, सागर गवळी, अशोक कुचेकर, बारामती शहर उपाध्यक्ष जितेंद्र कवडे, सम्यकचे विनय दामोदरे तसेच वंचितचे शाखा उपाध्यक्ष रोहित भोसले, सचिव शाहिद शेख, लक्ष्मण भोसले, धिरज भोसले, शितल भोसले, दत्तात्रय भोसले, भारत घाडगे, सचिन भोसले, प्रविण भोसले, संजय भोसले,  समिर भोसले, सागर भोसले, भारत भोसले, निलेश भोसले, अपक्ष सदस्य राजेंद्र भोसले, शेखर भोसले, उज्वला भोसले, सुधीर भोसले, रोहित भोसले, कृष्णा भोसले, तसेच आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती वंचितचे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी दिली.

No comments:

Post a Comment