इंदापूर येथे पडलेला दरोडयाच्या गुन्हयासह इतर ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस, १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ३ मोबाईलसह एकूण ५ लाख रूपयांचा मुददेमाल हस्तगत..
इंदापूर:- दिंनाक.०४.०५.२०२३ रोजी रात्री ००.४५ वा ते ०२.२० वा चे दरम्यान मौजे
कालठनं नं २ ता. इंदापुर जि. पुणे गावचे हद्दीत ५ अनोळखी इसमांनी तक्रारदार श्री. नवनाथ मेटकरी यांचे घरात घुसुन कोयत्याचा धाक दाखवुन तसेच मारहाण करून विवो कंपनीचे दोन मोबाईल तसेच श्री. सागर नामदेव रेडके घराचे रूमचे कुलुप तोडुन घरातील कपाटातील सोन्याचे दागीने चोरुन नेले होते. सदरचा
गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री. अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक श्री.आनंद भोईटे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश इंगळे व प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हे शोध पथकास तपासाबाबत मार्गदर्शक करून सदरचा गुन्हा
उघडकीस आणण्याची जबाबदारी दिली होती.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे. १. शुभम उर्फ दिलशार अशोक पवार वय २२ वर्षे, रा. दुधवडी, ता. कर्जत.जि.अहमदनगर, २. उमेश अनिल काळे वय १९ वर्षे,मुळ.रा.लोखंडेवस्ती,कटफळ, ता. बारामती.जि.पुणे ३. आदेश अनिल काळे वय १९ वर्षे, रा.लोखंडेवस्ती, कटफळ,ता.बारामती.जि. पुणे व एक विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसुन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून आणखी कालठण नं.२ येथे यापुर्वी केलेल्या दोन तसेच वडापूरी ता. इंदापूर येथील घरफोडीचा असे एकुण ४ गुन्हे उघडकीस आलेले आहे.
अद्या पर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आलेली असून एक आरोपी फरार आहे. अटक आरोपीत
यांच्याकडून त्यांनी चोरी केलेले ५ लाख रूपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ३
मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री. अंकित गोयल, अप्पर पोलीस
अधिक्षक श्री आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहा. पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, प्रकाश पवार, सफौ. भरत जाधव, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, शुभ खंडागळे, पोलीस नाईक संजय मल्हारे, सलमान खान
पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानूळे, विनोद लोंखडे, लक्ष्मण सुर्यवशी, गजेंद्र बिरलिंगे, अमोल खाडे, होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment