*बारामती तालुक्यातील ४५ वन्यजीव पानवठ्याना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या स्तुत्य उपक्रमाचा विरोधी पक्षनेते श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ.*
बारामती:- व्ही.आय.आय.टी. बारामती येथे ओंकार (भैय्या) जाधव मित्र परिवाराच्या वतीने बारामती तालुक्यातील ४५ पानवट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. श्री. अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती शहर अध्यक्ष श्री.जयदादा पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्री. राजेंद्र (आबा) बनकर,श्री.अनिल नामदेव गायकवाड, वनाधिकारी श्री.मोरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती शहर युवक अध्यक्ष श्री.अविनाश बांदल, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. दिलीप गायकवाड, श्री. विजय सोनाजी जाधव, श्री सुनील (आप्पा) जाधव, श्री दिनकर (आबा) जाधव, श्री. अनिल लक्ष्मण गायकवाड, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बारामती शहर उपाध्यक्ष श्री. सयाजीराजे गायकवाड, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री. सुरेंद्र गायकवाड, श्री. सुजित मोहन जाधव,श्री. राहुल गायकवाड,श्री. ईजाज खान, श्री. निलेश गायकवाड सर यांचेसह ओंकार भैय्या मित्र परिवाराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
उन्हाळ्याच्या दिवसात निर्माण होणारी पाणी टंचाई व त्यामुळे वनक्षेत्रात असणारे पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे वन्यजीवांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन मागील वर्षीपासून ओंकार (भैय्या) जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रपरिवाराने बारामती तालुक्यातील वन्यजीव पानवठ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला.स्तुत्य उपक्रमाची परंपरा याही वर्षी कायम ठेवण्यात आली.
माननीय अजितदादांनी या उपक्रमाचे कौतुक केले व आजच पानवठे भरण्यास सुरुवात करावी अशी सूचना केली. त्यांचे सूचनेनुसार ओंकार (भैय्या) मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन वंजारवाडी येथील पानवठा टँकरद्वारे भरून घेतला.
दौंडचे माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा. श्री. रमेश (आप्पा) थोरात यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल श्री सुरेंद्र गायकवाड सर यांचा विरोधी पक्षनेते मा. श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment