गुन्हे शोध पथकाची कामगिरी विक्रीस आणलेले एक गावठी पिस्टल, १ जिवंत काडतुस जप्त करून दोघास अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, May 21, 2023

गुन्हे शोध पथकाची कामगिरी विक्रीस आणलेले एक गावठी पिस्टल, १ जिवंत काडतुस जप्त करून दोघास अटक...

गुन्हे शोध पथकाची कामगिरी विक्रीस आणलेले एक गावठी पिस्टल, १ जिवंत काडतुस जप्त करून दोघास अटक...
इंदापूर:-दिंनाक २०.०५.२०२३ रोजी दुपारी १६:४५ वाजताच्या सुमारास गुन्हे शोध
पथकास मौजे.पसळसदेव ता.इंदापुर जि.पुणे गावचे हद्दीत गोवर्धेन हॉटेलच्या जवळ बायपास रोडवर इसम नामे माउली मोहन फुले वय २२ वर्षे व प्रविण मल्हारी शिंदे वय २७ वर्षे दोघे रा. पसळसदेव ता. इंदापुर जि.पुणे हे बेकायदा बिगर परवाना एक गावठी बनावटिचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना झाले. संशयीत
इसम माउली फुले व प्रविण शिंदे यास पोलीस आल्याचे चाहूल लागताच ते सदर ठिकाणाहून पळून जावू लागले असता त्यांना पथकाने जागीच पकडुन त्याची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता प्रविण शिंदे याचे कंबरलेला एक गावठी पिस्टल व त्यामध्ये एक जिवंत काडतूस बेकायदेशी, विना परवाना पिस्टल हे अग्नीशस्त्र जवळ मिळुन आल्याने त्यांचेवर भारतीय हत्यारे कायदा कलम ५(२५) प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करून त्यांना गुन्हयांचे तपास कामी अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीस मा.हु.कोर्ट सो इंदापुर यांच्या कोटीत हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळाले
असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोहवा/ ८३३ प्रकाश माने करित आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण श्री.अंकित गोयल, अप्पर पोलीस
अधिक्षक श्री.आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.गणेश इंगळे ,पोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार, प्रकाश माने, ज्ञानेश्वर जाधव, सचिन बोराडे, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल. नंदू जाधव, विनोद लोखंडे, गजानन वानूळे, गणेश डेरे,अकबर शेख होमगार्ड संग्राम माने यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment