बापरे..आरटीओमध्ये परस्पर
9 वाहनांना दिले बनावट सटिर्फिकेट;भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर.. पुणे :- आरटीओ कार्यालयात नेहमीची गर्दी असते या गर्दीत ज्यादा एजंट जास्त दिसतात हे चित्र पुण्यात आरटीओ कार्यालयाच्या गेट मधून एन्ट्री केली की दिसून येईल या ठिकाणी असलेली बेशिस्तपणा दिसल्या शिवाय राहत नाही,नुकताच मिळालेल्या माहितीनुसार आरटीओमध्ये एजंटचा सुळसुळाट असून तेथे एजंटमार्फत गेला नाहीत
तर तुमचे काम होणार नाही असे अनेक अनुभव आल्याचे त्रस्त नागरिकांनी बोलून दाखविले, अनेक चुका काढून हेलपाटे मारायला लावतात. कागदावर
वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही, अशा
कायमच तक्रारी येत असतात. आरटीओचा
कारभार तेथील अधिकारी आणि कर्मचारी न
पाहता एजंट पहात असल्याची टिका सातत्याने
होत असते. पण आता त्याच्याही पुढची पायरी
आरटीओमध्ये ओलांडली गेली आहे. चक्क
आरटीओच्या सिटीझन पोर्टल ॲपमध्ये बेकायदा प्रवेश करुन एका एजंटने 9 वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिले. हा प्रकार घडल्यानंतर आता तब्बल 7 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत मोटार वाहन निरीक्षक रेणुका
राधाकिसन राठोड (वय ४५) यांनी बंडगार्डन
पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८३/२३)
दिली आहे. हा प्रकार संगम पुल येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात १७ नोव्हेबर २०२२ रोजी दुपारी २:५३ ते १८:१९ वाजेच्या दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी या मोटार वाहन निरीक्षक म्हणून काम करत असताना त्यांच्या लॉगिन आय डीचा पासवर्ड प्राप्त करुन चोरट्याने वाहन (40) या सिटीझन पोर्टल ॲपमध्ये बेकायदेशीरपणे
प्रवेश केला.त्यात एन्ट्री, अॅप्रुव्हल, व्हेरीफाय केले. त्याच्या प्रिंट काढून 9 वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले.जवळपास 3 तास फिर्यादीच्या पासवर्डचा गैरवापर या आरोपीने केला तरी त्यांना त्याचा त्यावेळी लक्षात आले नाही.नंतर आपण हे 9 अर्ज पास केले नसताना त्यांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
त्यानंतर खात्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर
आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक आश्विनी सातपुते तपास
करीत आहेत.
No comments:
Post a Comment