धक्कादायक..फोन हिसकावून घेतला म्हणून रागाने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेटपार्टवरच बायकोने टाकलं उकळतं तेल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 16, 2023

धक्कादायक..फोन हिसकावून घेतला म्हणून रागाने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेटपार्टवरच बायकोने टाकलं उकळतं तेल..

धक्कादायक..फोन हिसकावून घेतला म्हणून रागाने झोपलेल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट
पार्टवरच बायकोने टाकलं उकळतं तेल..
ग्वालियर:- फोन वापर किती भयानक झालाय याची प्रचिती एका धक्कादायक घटनेवरून दिसून येईल नुकताच मध्यप्रदेशमधील
ग्वालियर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका पत्नीने आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं तेल ओतलं आहे. या घटनानंतर आरोपी पत्नी घटनास्थळावरून फरार झाली असून जखमी
झालेल्या पतीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.अधिक माहितीनुसार, ग्वालियर शहरातील कंपू स्टेशन भागामध्ये राहणारा सुनील धाकड खासगी नोकरी करतो.तर तो आपली पत्नी भावना हिच्यासोबत येथे राहतो. एके दिवशी एका शेजारी महिलेने सांगितलं की, तुम्ही कामावर
गेल्यावर तुमची पत्नी माझ्या पतीसोबत बोलते. यानंतर सुनीलने त्याच्या पत्नीला समजावलं होतं पण तिने पतीचं ऐकलं नाही. एके दिवशी सुनील कामावरून घरी आला असता पत्नी भावना शेजारच्या महिलेच्या पतीसोबत फोनवर गप्पा
मारताना त्याला दिसली. यानंतर सुनीलने भावनाकडील मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईल हिसकावल्यानंतर ती नाराज झाली आणि निघून गेली. रात्री सुनील झोपेत
असताना ती आली आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळतं तेल ओतलं.दरम्यान, तेल एवढं गरम होतं की यामध्ये सुनील चांगलाच
भाजला. पण तेल ओतल्यानंतर पत्नी फरार झाली.सुनीलने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर शेजाऱ्यांनी सुनीलला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध
सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment