विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करत घेतला सुरक्षेचा आढावा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, June 16, 2023

विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करत घेतला सुरक्षेचा आढावा...

विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करत घेतला सुरक्षेचा आढावा...                                                          बारामती:- विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला सध्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे. सदर पालखी मार्गावर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांनी आज यवत पासून पालखी महामार्गाच्या सुरक्षेची पाहणी केली सुरक्षेबाबत वरिष्ठ अधिकारी व पोलीस घटकातील शेवटचा पोलीस अमलदर यांना समक्ष भेटून प्रत्येक पॉईंटवर सूचना दिल्या. प्रत्येक पालखी मुक्कामी व विसाव्याच्या ठिकाणी पब्लिक ऍड्रेस सिस्टम व्यवस्थित ठेवण्याबाबत व त्याचा सुरक्षा आढावा घेण्याबाबत सूचना केल्या तसेच इतर शासकीय खात्यांबरोबर योग्य तो समन्वय ठेवण्याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच पालखीसोबतच्या सुरक्षा बद्दलची माहिती दिली. तसेच सर्व वारकऱ्यांना पोलीस दलातर्फे संपूर्णपणे सुरक्षा दिली जाईल कोणत्याही प्रकारची अडचण वारकऱ्यांना येऊ देणार नाही अशी त्यांनी नमूद केले. सदर वेळी बारामती शारदा प्रांगण या ठिकाणी त्यांनी मुक्काम स्थळी पाहणी करून सूचना दिल्या त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक माननीय नितेश गट्टे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक बारामती शहर पोलीस निरीक्षक मोरे बारामती तालुका हेही हजर होते. उपस्थित पत्रकारांसोबत शारदा प्रांगण या ठिकाणी त्यांनी वार्तालाप केला.

No comments:

Post a Comment