खळबळजनक..बारामतीकरांचे आरोग्य धोक्यात तर नाही ना?सायंकाळच्या वेळेस येतोय दुर्गंधीयुक्त वास... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, June 15, 2023

खळबळजनक..बारामतीकरांचे आरोग्य धोक्यात तर नाही ना?सायंकाळच्या वेळेस येतोय दुर्गंधीयुक्त वास...

खळबळजनक..बारामतीकरांचे आरोग्य धोक्यात तर नाही ना?सायंकाळच्या वेळेस येतोय दुर्गंधीयुक्त वास...                                                 बारामती(संतोष जाधव):-गेल्या काही दिवसांपासून बारामती कर वेगळ्याच दुर्गंधी वासाचे शिकार होत असल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात असून नक्की हा वास येतो कुठून हे समजले नसल्याचे अनेकांनी बोलून दाखविले असून याबाबत भीती व्यक्त केली आहे, बारामतीत पालखीचे लवकरच आगमन होत असून लाखो भाविक येत आहे अश्या वेळी सायंकाळ च्या वेळेस येणारा दुर्गंधी वास हा आरोग्यासाठी घातक तर नाही ना?अशी भीतीदायक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात याबाबत आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही उपाय योजना राबविणार आहेत की नाय हे कळेलच पण सद्या तरी या येणाऱ्या दुर्गंधी वासाने बारामती कर मात्र त्रस्त झाल्याचे दिसत असून नागरिक यासाठी रस्त्यावर आल्या शिवाय राहणार नाही,त्यामुळे तात्काळ उपाय योजना राबविण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment