पुणे :-पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील दोन तरुण मुलांशी विवाह करून रोख रक्कम व दागिने घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरी मुलीसह सहा जणांच्या टोळीला जुन्नर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली.या बनावट नवरीने मागील दीड वर्षात पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील सुमारे वीस मुलांशी विवाह करून आर्थिक फसवणूक केल्याची कबुली प्राथमिक तपासात दिली आहे,
अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व तपासी अधिकारी व्ही. व्ही. ध्रुवे यांनी दिली.या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अटक केलेली बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे
( वय ३५, रा. मुरंबी शिरजगाव, ता. त्रंबकेश्वर, जि.नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (वय ३९),तुकाराम भाऊराव मांगते (वय २३, दोघेही रा. अंबुजा वाडी,इगतपुरी घोटी, जि. नाशिक), बाळू भिकाजी काळे (वय
४६, रा. बोटा, ता. संगमनेर, जि. नगर), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (वय ६४ रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू गुलाब सरवदे (वय ४१, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) या आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. ध्रुवे हे करत आहेत. प्राथमिक पोलिस तपासात या टोळीने मागील दोन महिन्यात जुन्नर तालुक्यातील चार, संगमनेर तालुक्यातील दोन, अशा सहा जणांची; तर मागील दीड वर्षात पुणे, नगर,नाशिक जिल्ह्यातील एकूण वीस मुलांशी विवाह करून
लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची कबुली दिली.
No comments:
Post a Comment