"तू आमच्यासोबत दारु का घेतली नाही" म्हणत चाकूचे वार करत गंभीर जखमी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 12, 2023

"तू आमच्यासोबत दारु का घेतली नाही" म्हणत चाकूचे वार करत गंभीर जखमी..

"तू आमच्यासोबत दारु का घेतली नाही" म्हणत चाकूचे वार करत गंभीर जखमी..
शिरूर:-  ऐकावे ते नवलच चक्क दारू पीत नाही म्हणून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील साकोळ येथील एका युवकाला तू आमच्या सोबत दारू का पिला नाहीस? असे म्हणून चौघांनी संगनमत करत चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तो युवक
गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
केला आहे. यातील एकाला पोलिसांनी अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी सांगितले, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील सोनू माळी, फिरोज शेख, चंदू माने, सोहेल शेख या चौघांनी संगनमत केले. तुकाराम सूर्यवंशी याला
जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूचे वार करत गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या तुकाराम सूर्यवंशीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार
सुरू आहेत. याबाबत तुकाराम सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३२४,३२३, ५०४, ३४ भादवि ३ (२) (व), अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील चंदू माने याला पोलिसांनी अटक
केली असून, अन्य तिघे फरार आहेत. तपास सहायक पोलिस उपाधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर अनंतपाळ ठाण्याचे पोलिस करत आहेत.अटक करण्यात आलेला आरोपी चंदू माने याला सोमवारी
न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी दिली.

No comments:

Post a Comment