बारामतीतील प्रशासनाला कधी येणार जाग? मोकाट कुत्र्यांना कधी बसणार आळा.. बारामती:- नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये तीन मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलीचे लचके तोडत असल्याचे दिसत असून हे दृश्य पाहून मन हेलावून जातंय हे चित्र किती भयानक व विधारक आहे याची पुनरावृत्ती होऊ यासाठी नेहमी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट अश्या बातम्या प्रसिद्ध केल्या परंतु बारामतीमध्ये प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्री फिरताना व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अंगावर धावून जात असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले ,लहान मुले व वयोवृद्ध लोक रस्त्यावरून जास्त प्रमाणात ये जा करीत असतात, शाळा चालू असल्याने नागरिक व विद्यार्थी यांची रस्त्यावर गर्दी वाढली आहे तसेच, पहाटेच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या महिला व वयोवृद्ध लोक असतात त्यामुळे तात्काळ अश्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अन्यथा एखादी दुर्देवी घटना घडू नये याची खबरदारी प्रशासनाने वेळीच घ्यावी अशी मागणी पत्रकार संतोष जाधव यांनी केली आहे.
Post Top Ad
Friday, June 30, 2023
बारामतीतील प्रशासनाला कधी येणार जाग? मोकाट कुत्र्यांना कधी बसणार आळा..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment