*कैलास धाम* सुद्धा क्षणभर शहारली , क्षणात या स्मशान भुमीचे "वीर भुमीत" रूपांतर.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 19, 2023

*कैलास धाम* सुद्धा क्षणभर शहारली , क्षणात या स्मशान भुमीचे "वीर भुमीत" रूपांतर..

*कैलास धाम* सुद्धा क्षणभर शहारली , क्षणात या स्मशान भुमीचे  "वीर भुमीत" रूपांतर..
बारामती:- बारामती वीरशैव लिंगायत स्मशान भुमी *कैलास धाम* सुद्धा क्षणभर शहारली , क्षणात या स्मशान भुमीचे  "वीर भुमीत" रूपांतर झाले. कारण कै. दत्तात्रय दोराप्पा पिल्ले या वीर जवानाचे पार्थिव चिर विश्रांती साठी या स्मशानभुमित दाखल झाले आणि प्रथमच लष्करी इंत मामात झालेला अत्यं विधी सोहळा अनुभवला
एक विलक्षण योगायोग असा की समोरील रस्त्यावरून टाळ मृदुंगाचे गजरात संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत होता आणि इकडे त्याच वेळी या वीरजवानास आकाशात बंदुकीच्या फायरिंग झाडुन  लष्कराचे जवान अखेरचा निरोप देत होते. अवकाशा मधे टाळ मृदंगाचा व फायरिंग निघणारा आवाज यांचा एकच मिलाप झाला एक अनोखी मान वदंना नशीबाने प्राप्त होते.
कुटुंबीयाना तिरंगा ध्वज प्रदान करणेचा तो प्रसंग पाहुन क्षणभर अंगावर शहारे आले , नकळत ये मेरे वतन के लोगो , हे गाने आठवले व डोळ्यात पाणी तरळले.
या वीर जवानाने काश्मीर मधे कार्यरत असताना अनेकदा अतिरेक्यां बरोबर दोन हात केले परंतु शारीरीक व्याधी बरोबर तो दोन हात नाही करू शकला असो नियती पुढे कुनाचे काही चालत नाही अशा या वीर जवानास आमचा अखेरचा सॅल्युट...*वीर जवान अमर रहे*

No comments:

Post a Comment