धूम स्टाईलने शहरात भरधाव वेगात गाड्या चालविण्याऱ्याची वाढू लागलीय भीती..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 10, 2023

धूम स्टाईलने शहरात भरधाव वेगात गाड्या चालविण्याऱ्याची वाढू लागलीय भीती..!

धूम स्टाईलने शहरात भरधाव वेगात गाड्या चालविण्याऱ्याची वाढू लागलीय भीती..!             बारामती:-बारामती शहरात व आजूबाजूच्या परिसरात दिवसेंदिवस शहरातील युवकांमध्ये
दुचाकीने स्टंट स्टाईल मारण्याची फॅशन वाढतच आहे.वाहतुकीचे नियम मात्र वाऱ्यावर ठेवून युवक धूम स्टाईलने शहरात भरधाव वेगात गाड्या चालवत असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांचा जीव धोक्यात सापडला आहे.शहरातील अशा बेजबाबदार बाईकस्वारांना कोण रोखणार ? असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहे. कर्णकर्कश हॉर्न आणि फटाके फोडणारे सायलेंन्सर वाहने, स्टंट मारणाऱ्या दुचाकी यांच्यावरील वाहतूक पोलिसांचे कारवाईचे दावे कागदावरच असल्याचे बोलले तर वावगे ठरणार नाही, नागरिक बाहेर खरेदीसाठी पडत आहेत. रस्ते आता गजबजले
आहे. त्यातही काही बेजबाबदार युवक गाड्या
बेजबाबदारीने चालवत आहेत. त्यामुळे काही जण या चालकांमूळे जखमी सुद्धा झाले आहेत. आधीच काही भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यातच या दुचाकी युवकांच्या त्रासामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा या बेजबाबदार वाहनचालकांमुळे नागरिकांचा मॉर्निंग
वॉक व इव्हेंनिंग वॉक सुध्दा जीवघेणा बनला आहे.एकीकडे शहराची झपाट्याने वाढ होतच चालली आहेत, त्यातच वाहनांची संख्या देखील दुप्पट वाढत चालली आहे. बेजबाबदारपणे चालविणारे आणि जोरदार हॉर्न कर्कश आवाज करत काही युवक शहरात बिनधास्तपणे गाड्या चालवितात त्यामुळे अनेक नागरिक भयभीत देखील होत आहेत.आतापर्यंत धूम स्टाईलमुळे अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. यावर नियंत्रण कोणाचेच नाही,अनेक वाहन चालक अपघाताचे नियम देखील पाळत नाहीत. त्याचा परिणाम अनेक नागरिकांना जीव
मुठीत घेऊन प्रवास/ पायदळ करण्याची वेळ आली आहे. पायी चालणाऱ्यांपासून ते वाहनधारकांना या बेजबाबदार चालकांचा त्रास होत आहेत. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. यावर जनजागृती करण्याची देखील गरज आहे. पण वाहतूक पोलीस याकडे कानाडोळा करत असल्याने वाहनचालकांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी
हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या कारवाई केल्या या शहरात दुचाकी वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनांमध्ये आणि दुचाकिंमध्ये मोडीफिकेशन करून जास्त आवाजाचे सायलेंन्सर,हॉर्न बसविण्यात येतात. मोटार वाहन कायद्याअंतर्गत ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉन व फटाके फोडणारे सायलेंन्सर असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच स्टंट मारून भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या विरोधात 184 प्रमाणे कारवाई करून 1 हजारांचा दंड आकारला जाऊ
शकतो. पण वाहतूक पोलिस याकडे कानाडोळा करत ठोस कारवाई करत नाही. त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच कारवाई केली आहे.बारामती शहरातील टी सी कॉलेज कडे जाणारे दोन्ही रोड, रिंग रोड, एम आय डी सी रोड पाटस रोड असे अनेक रस्ते आहे ज्या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणात असताना रोड रोमियो दुचाकी जोरात चालवीत असतात अश्यावर कडक कारवाई होणं गरचेच आहे.

No comments:

Post a Comment