धक्कादायक...पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीवर दाढी करण्याच्या ब्लेडने वार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 27, 2023

धक्कादायक...पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीवर दाढी करण्याच्या ब्लेडने वार...

धक्कादायक...पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीवर दाढी करण्याच्या ब्लेडने वार...                   लातूर;-नुकतीच पोलीस अधिकारी यांनी स्वतःच्या पत्नीवर व पुतण्यावर गोळीबार करत  शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर थेट दाढी करण्याच्या ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून हा हल्ला केल्याचे
बोलले जात आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास लातूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. तर याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.पोलीस कर्मचाऱ्याकडूनच पत्नीवर ब्लेडने वार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिलेने
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यातआला आहे. या तक्रारीत जखमी महिलेने म्हटले आहे की,लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तिच्या पतीने तिला फोन केला होता. फोन करून औसा रोडवरील राजीव गांधी चौकातील मुलांच्या
एका वसतिगृहात बोलावून घेतले. महिला त्या ठिकाणी पोहचल्यावर उलट तू येथे कशी काय? अशी विचारणा सुरु केली. तसेच तू येथे काय करतेस, असं म्हणत वाद घालूलागला. दरम्यान, तुम्हीच फोन करून बोलावून घेतले म्हणून येथे आल्याचं उत्तर महिलेने दिले. त्यामुळे याचाआलेल्या पोलीस पतीने पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आधी शिवीगाळ केल्यावर नंतर त्याने पत्नीसोबत वाद
घालायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने थेट केस ओढून,लाथाबुक्यांनी पत्नीला मारहाण सुरु केली. एवढंच नाही तर, काही वेळाने या पोलीस कर्मचाऱ्याने दाढी करण्याच्या ब्लेडने पत्नीवर वार केला. ज्यात महिला गंभीर जखमी
झाली आहे. त्यामुळे या महिलेला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. तर जखमी महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.कौटुंबिक वादातून हल्ला,शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका
पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच पत्नीला मारहाण करत तिच्यावर ब्लेडने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. तर,पोलीस दलात देखील याची जोरदार चर्चा आहे. मात्र, हे सर्व प्रकरण कौटुंबिक असून हा प्रकार देखील कौटुंबिक
वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment