उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 28, 2023

उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..

उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न..      बारामती:-नुकताच बारामती तालुका व शहरच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले होते, महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी आयोजित रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी भाजपाचे नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष मा श्री वासुदेव {नाना} काळे उपस्थित होते यावेळी रक्तदान कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मा. श्री वासुदेव नाना काळे यांच्या शुभहस्ते पार पडल्यानंतर  नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजक भाजपयुवा  मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजित मासाळ भाजपयुवा शहराध्यक्ष विक्रम पंत थोरात श्रीनिवास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केले होते यावेळी बारामती भाजप शहराचे शहराध्यक्ष श्री सतीश फाळके व त्यांच्या सहकारी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांचा सत्कार केला त्याचबरोबर तालुक्याच्या वतीने  हॉटेल मधुबन येथे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांचा सत्कार तालुका अध्यक्ष पांडुरंग मामा कचरे यांनी जेष्ठ नेते चंद्ररावआण्णा तावरे,यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी उपस्थित भाजपा बारामती विधानसभेचे निवडणूक प्रमुख रंजन काका तावरे भाजपा नेते अविनाश दादा मोटे, भाजपचे तालुका अध्यक्ष पांडुरंग मामा कचरे, भाजपा शहर चे शहराध्यक्ष सतीशजी फाळके,शहर महिला अध्यक्ष पिंकीताई मोरे, तालुका महिला अध्यक्ष सौ वर्षा भोसले
व भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिलावर्ग व रक्तदाते उपस्थित होते,
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 319 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

No comments:

Post a Comment