धक्कादायक..दोन इस्टेट एजंटच्या वादात एकाच्या गळ्यावर वार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 2, 2023

धक्कादायक..दोन इस्टेट एजंटच्या वादात एकाच्या गळ्यावर वार..

धक्कादायक..दोन इस्टेट एजंटच्या वादात एकाच्या गळ्यावर वार..
पुणे:-जमिनीचे दर गगनाला भिडले असून इस्टेट एजंट देखील खूप वाढले आहे,एका जागेच्या व्यवहारासाठी अनेक जण धडपडत असतो आणि कुण्या एकाला ह्या व्यवहाराचा लाभ(कमिशन)होतो यातून यामध्ये तुला मला असे अनेक वाद इस्टेट एजंट मध्ये सुरू होतात त्यामधून वाद विकोपाला जातो,नुकताच जागा खरेदी-विक्री करणाऱ्या दोन इस्टेट एजंटमध्ये
झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर शस्त्राने
गळ्यावर व हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीअसल्याचे नुकताच मिळालेल्या माहितीनुसार पंढरपुर वारीवरून परतत असताना त्यांचा टेम्पो अडवून वाद घालत हा हल्ला करण्यात आला आहे.पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात सागर गणपत गायकवाड (वय ३५, रा. सांगरूण ता.हवेली) याच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात पोपट नथु पवार (वय ४४) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.पोलिसांकडून या तिघांचा शोध घेतला जात आहे.तक्रारदार पोपट व सागर हे दोघेही एकाच गावातील आहेत. ते जागा खरेदी-विक्री करण्याचे काम करतात. त्यांच्यात वाद झाला होता. दरम्यान, पोपट हे गावातील सहकार्यांसोबत पंढरपुर वारीत गेले होते. तेथून ते टेम्पोने येत असता त्यांची गाडी अडवून त्यांच्याशी वाद घालत पोपट यांच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर लागलीच दुसरा वारही केला, परंतु, हात आडवा घातल्याने तो वार हातावर झेलल्याने ते थोडक्यात बचावले गेलेअधिक तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment