श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्ताने सांस्कृतीक कार्यक्रमाचा धमाका..
बारामती:- क्षत्रियनगर,टकार कॉलनी येथील श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्ताने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवानिमित्त
9 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर ) यांचे सायं. 5.30 वा. पाटस रोड,वृंदावन मंगल कार्यालय देशमुख चौक बारामती याठिकाणी विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत किर्तन होणार असून दि.10 ऑगस्ट रोजी सायं. 7 वा.क्षत्रियनगर, टकार कॉलनी बारामती याठिकाणी लहान मुलांचा डान्स कार्यक्रम होणार आहे.दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा. श्रींच्या मुर्तीचा अभिषेक, 9.30 वाजता श्रींच्या मुर्तीची पालखी मिरवणुक
बारामती शहरातुन निघणार आहे.दुपारी 12.30 वा. बारामती बँकेचे चेअरमन सचिनशेठ सातव,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,शहराध्यक्ष जय पाटील, मा. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर,सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. प्रेमेंद्र देवकाते, स्त्रीरोगतज्ञ डॉ. विशाल मेहता व सामाजिक कार्यकर्ते ओंकार जाधव या मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात येणार आहे.याच दिवशी दुपारी 12.30 ते 3.00 या वेळेत महाप्रसाद(भोजन)चा कार्यक्रम आहे, तर सायं.6 ते 7 वाजता महिलांचा मंगळागौरी कार्यक्रम होणार आहे.सायं. 7 वा. महाआरती, सायं. 7.30 वाजता सत्कार समारंभ
होणार आहे. या कार्यक्रमास शरयु फौंडेशनच्या अध्यक्षा सौ.शर्मिलावहिनी पवार, मा. नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे,सौ.भारती मुथा, मा.ज्येष्ठ नगरसेवक ऍड. सुभाष ढोले,मा.जि.प.अध्यक्ष विश्वासनाना देवकाते हे उपस्थित राहणार
आहेत.रात्रौ. 8 वा श्री छत्रपती शिवाजी महाराज काव्य गौरव राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्री.ह.भ.प.महादवे महाराज पळसदेवकर (सिंधखेडकर, जि. जालना) यांचा भारूडाचा
कार्यक्रमा होणार आहे. या सर्व कार्यक्रमादरम्यान सुत्रसंचालन महेंद्र सोपान गायकवाड (सर) हे करणार आहेत.सदर कार्यक्रमाच्या सर्वांना निमंत्रण पत्रिका पाठविलेल्या आहेतच, मात्र नजरचुकीने कोणाला निमंत्रण मिळाले
नसल्यास हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास उपस्थित रहावे असेही आवाहन श्री सिद्धीविनायक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल नामदेव गायकवाड यांनी केले असून गेली 25 वर्षे प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक सामाजिक,धार्मिक,गरजूंना मदत, सामुदायिक लग्न सोहळा,सांस्कृतीक कार्यक्रम असे अनेक उपक्रम अध्यक्ष सह त्यांच्या सोबत गेली 25 वर्षे हिरहिरीने सहभागी घेतलेले पदाधिकारी सदस्य, समाज बांधव, मित्रपरिवार, महिला भगिनी यांनी मोलाचे सहकार्य करीत आले आहे.
No comments:
Post a Comment