हादरून टाकणारी घटना;आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत,दगडाने तोंड ठेचून केला खून.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 4, 2023

हादरून टाकणारी घटना;आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत,दगडाने तोंड ठेचून केला खून....

हादरून टाकणारी घटना;आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत,दगडाने तोंड ठेचून केला खून....                                                             जळगाव:- धक्कादायक घटना नुकतीच पुढे आली यामध्ये संपूर्ण गाव नव्हे तर जिल्हा हादरून गेल्याची घटना उघडकीस आली याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव
जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचे घटना समोर आली होती. या घटनेप्रकरणी आज चौथ्या दिवशी आरोपी असलेल्या स्वप्निल पाटील याने आपण केलेल्या अपराधाची कबुली दिली आहे. पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात, पीडित मुलगी ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबत दगडाने डोकं ठेचून तिचा खून केल्याची माहिती आरोपीने दिले आहे. या धक्कादायक घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
गुरुवारी आरोपीच्या अटकेची मागणी करत गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली आहे. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली
आहे. यामधून, आरोपीला पीडित मुलीचा मृतदेह गंजीत लपवून त्याची विल्हेवाट लावायची होती. मात्र या घटनेनंतर गाव तिन दिवस जागे होते. तसेच गावच्या वेशीवर पहारा असल्यामुळे त्याला पीडित मुलीच्या मृतदेहाला लपविता आले नसल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिढीतेचा शोध घेत
असताना खळ्यातून उग्रदर्प येऊ लागल्याचे जाणवले होते.यानंतर तेथे तपासून पाहिल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आला. पुढे करण्यात आलेल्या तपासात पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली. तसेच
आरोपीने मृतदेह कोणाला सापडू नये यासाठी तो गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवण्याचे सत्य समोर आले.ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.गोंडे गावात आठ वर्षीय पीडित मुलगी रविवारी घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेऊन देखील ती न सापडल्यानंतर शेवटी पोलिसात तक्रार दाखल
करण्यात आली होती. या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतर चौथ्या दिवशी गावातीलच विनोद पाटील यांच्या खळ्यातून उग्रदर्प येऊ लागला. यानंतर कडबा उचलत असताना मुलीचा मृतदेह बाहेर आल्यानंतर सर्वांच्या पायाखालील जमीन सरकली. पुढे याप्रकरणी ताबडतोब
कारवाई करत पोलिसांनी विनोद पाटील यांच्या मुलाला म्हणजेच स्वप्निल पाटीलला ताब्यात घेतले.सलग दोन दिवस चौकशी करून देखील स्वप्निलकडून कोणतीच माहिती सांगण्यात आली नाही. शेवटी पोलिसांनी सुरुवातीपासून एकेक धागेदोरे त्याच्यासमोर मांडल्यानंतर स्वप्निलने आपला गुन्हा कबूल केला. यावेळी त्याने, पीडित
मुली सोबत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे कबूल केले. तसेच, प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारुन तिची निर्घृण हत्या केली. आणि मृतदेह गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला असल्याचे देखील स्वप्निलने आपल्या कबुली जबाबात सांगितले.

No comments:

Post a Comment