कोल्हापूर आयर्नमॅन चा 'ओम' मानकरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 11, 2023

कोल्हापूर आयर्नमॅन चा 'ओम' मानकरी..

कोल्हापूर आयर्नमॅन चा 'ओम' मानकरी..
बारामती:-कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब च्या वतीने कोल्हापूर हाल्फ आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले (रविवार १० सप्टेंबर २०२३)  या मध्ये १८ ते ३० वयोगटात बारामती सायकल क्लब चा ओम सावळेपाटील याने प्रथम अंक मिळवला.सदर स्पर्धेत  १.९ किलोमीटर पोहणे,९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर पळणे हे तिन्ही क्रीडा प्रकार ४ तास व 56 मिनिटात ओम ने पूर्ण केले राज्यभरातून ११० स्पर्धेकांनी भाग घेतला होता. सर्व वयोगटातील गुणांनुसार ओव्हर ऑल दुसरा क्रमांक ओम यांनी पटकाविला आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष डॉ प्रदीप पाटील, संचालक चैतन्य चव्हाण, विजय कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते ओम ला सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी कोल्हापूर स्पोर्ट्स अकॅडमी, कोल्हापूर ॲथलेटिक क्लब चे सदस्य उपस्तीत होते.कोल्हापूर येथील स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढला  असून राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या टायमिंगचा म्हतपूर्ण  उपयोग होणार असल्याचे ओम सावळेपाटील यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment