बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न दिल्यास आत्मदहन करणार; प्रशांत सोनवणे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 24, 2023

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न दिल्यास आत्मदहन करणार; प्रशांत सोनवणे

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न दिल्यास आत्मदहन करणार; प्रशांत सोनवणे
बारामती(प्रतिनिधी):- दि २३  सध्या बारामती येथील एस.टी बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे.एखादे एअरपोर्ट वाटावे असे पंचतारांकित बसस्थानक लवकरच उभे रहात आहे. 
     हे बसस्थानक ( इनाम वर्ग ६ ब महार वतना ) च्या जागेवर उभे आहे. जेव्हां ही जागा शासनाने बसस्थानका साठी संपादित केली तेव्हां जागा मालकांना अर्थात वतनदारांना कसल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नव्हता. आता जर या बस स्थानकास डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची  माफक मागणी असेल तर ती मान्य करण्यास काय हरकत आहे ? परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत विष्णू सोनवणे हे बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमात आत्मदहन करणार आहेत या बाबतचे निवेदन  दि २३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना देण्यात आले आहे ,
     शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन ह्दय सम्राट सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही  रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानकाचे प्रवेशद्वारा वर दि १४ एप्रिल २०२३ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती" असा फलक लावून प्रतिकात्मक उदघाटन केले आहे. पण अधिकृत निर्णय होणं गरजेचं आहे आहे म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार  साहेब यांना , रिपब्लिकन सेनेच्या वतीने शिष्ट मंडळाने भेट घेतली त्या वेळी प्रशांत विष्णू सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे बारामती बस स्थानकाचे उद्घाटन लवकरच होणार आहे त्या वेळी जर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बारामती बस स्थानकास न दिल्यास बारामती बस स्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमच्या ठिकाणी आत्मदहन करणार आहे याची सर्व जबाबदारी बारामती चे लोक प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती लोकसभेच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे, शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र शासन जबाबदार राहतील असे निवेदनातून इशारा दिला आहे त्या वेळी रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश चव्हाण, यांच्या सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment