बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपनामुळे नागरिकांच्या घरातील 29 टीव्ही जळाले.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 25, 2023

बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपनामुळे नागरिकांच्या घरातील 29 टीव्ही जळाले..

बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपनामुळे नागरिकांच्या घरातील 29 टीव्ही जळाले.. 
बारामती:-बारामती येथील महावितरण
कंपनी बारामती शहरातील विद्युत पुरवठा
गेली चार दिवसापासून वारंवार खंडित होत
असून आमराई भागातील नागरिकांची
तारांबळ उडत आहे याच कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक हाय
व्होल्टेज आल्यामुळे आंबेडकर वसाहत येथील
नागरिकांच्या घरातील 29 टीव्ही जळाल्याची माहिती समजते यामुळे नागरिकांच्या घरातील टीव्हीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे देखील समजते यावर महावितरण कंपनीने आमराई भागातच निकृष्ट दर्जेचे अंडरग्राउंड वायरिंग केल्याचे देखील  स्थानिक
नागरिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे
त्या ठिकाणी विद्युत पुरवठा दुरुस्तीचे काम
करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चूक आहे की
महावितरण कंपनीने आमराई भागात जाणुन बुजून टक्केवारी साठी निकृष्ट दर्जाची वायरिंग टाकून केलेल्या कामामध्ये चूक केली ?अशी चर्चा होताना दिसत आहे,तर बारामतीत काही भागात बारामती नगरपरिषद सुद्धा काही ठेकेदारांना वशीलेबाजीने कुठे राजकिय पक्षाच्या पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपातून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देऊन ती कामे निकृष्ट झाल्याचे देखील बोलले जात असून यातून काही अपघात घडतात अशी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.

No comments:

Post a Comment