पुसेसावळी येथील हिंसाचारात निष्पाप बळी गेलेल्या शहीद नुरुलहसन यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळवून देण्याची खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्याकडे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ची मागणी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 25, 2023

पुसेसावळी येथील हिंसाचारात निष्पाप बळी गेलेल्या शहीद नुरुलहसन यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळवून देण्याची खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्याकडे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ची मागणी...


पुसेसावळी येथील हिंसाचारात निष्पाप बळी गेलेल्या शहीद नुरुलहसन यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळवून देण्याची खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्याकडे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान ची मागणी...
बारामती:- पुसेसावळी ता खटाव जि सातारा येथील अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला करून निष्पाप नूरूल हसन शिकलगार याचा बळी घेतला गेला व अन्य 14 लोकांना मारहाण करुन गंभीर जखमी केले घराची व दुकानांची तोडफोड करण्यात आली गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि एका प्रकारे दहशतीचा वातावरण तयार करण्यात आले यासंदर्भात महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे शिष्टमंडळ यांनी खासदार सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेऊन चर्चा करुन हिंसाचारात बळी पडलेल्या शहीद नुरुलहसन यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना ५० हजाराची मदत महाराष्ट्र शासन कडुन मिळवून देण्यासाठी निवेदन दिले व मुस्लिम समाजाला मुस्लिम संरक्षण कायद्याची मागणी केली आणि काही समाजकंटक दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जाहीररित्या भाषण करुन वातावरण खराब करीत आहे यांच्या भाषणावर बंदी घालुन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आली खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी शासन दरबारी याचा पाठपुरावा करुन पिडीतांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले यावेळेस महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे प्रदेश अध्यक्ष अजहर शेख, संघटक आफ्रोज मुजावर, फिरोज सय्यद, रेहान शेख, रिजवान सय्यद, समीर झारी, रमजान शेख, मोहसिन नदाफ, अहमद शेख, जावेद पठाण,   शोएब तांबोळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment