बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक;बडे मासे गळ्याला लागण्याची शक्यता.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 22, 2023

बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक;बडे मासे गळ्याला लागण्याची शक्यता..

बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक;बडे मासे गळ्याला लागण्याची शक्यता..
बारामती:-ता. १९/९/२०२३ रोजी बारामती शहरामध्ये पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, अविनाश शिवाजी शिंदे रा.पिंपळी ता. बारामती जि.पुणे याने आपलेकडे काही मिफेनटरमीन ( MEPHENTERMINE ) हे मानवी
शरीरास घातक इंजेक्शन जवळ बाळगले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, गणेश पाटील पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे अक्षय सिताप, दशरथ इंगोले, सागर जामदार,दादासाहेब जाधव यांना मिळालेली माहिती सांगून सदर इसमास ताब्यात घेवून खात्री करणेबाबत कळविले
असता सदर पथकाने तात्काळ सदर इसमाची माहिती काढून त्यास ताब्यात घेतले असता अविनाश शिवाजी शिंदे याने त्याचेकडे मिफेनटरमीन ( MEPHENTERMINE ) नावाचे १२ इंजेक्शन जवळ बाळगले स्थितीत
मिळून आले.
 सदर इसम नामे अविनाश शिवाजी शिंदे रा. पिंपळी ता. बारामती जि. पुणे याचेवर बारामती
शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करीत आहेत.सदर अटक इसमाकडून अशा प्रकारचे घातक इंजेक्शन विकणाऱ्या लोकांची नांवे पुढे येतील अशी शक्यता आहे. त्यात शहरातील काही जीमचे चालक व इतरही काही बडे मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे.
सदरबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक सचिन शिवदास बुगड यांनी बारामती
शहर पोलीस स्टेशन येथे भेट देवून सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराचे आजारामध्ये केला जातो. परंतू सध्या सदर इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले ही व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत
असल्याची सांगितले आहे. तसेच सदर इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे,किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे.अशा प्रकारे बेकायदेशिरपणे इंजेक्शन बाळगणाऱ्या इंसमांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ
पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आवाहन केले आहे.
तसेच, अशा प्रकारच्या शरीरास घातक असणारे इंजेक्शन घेवून स्वतः चे आरोग्याची तसेच
शरीराचे अवयव कायमस्वरुपी निकामी करुन घेण्याऐवजी पारंपरिक व्यायाम करुन शरीरयष्टी कमविण्याकडे तरुणांनी भर द्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. अंकीत गोयल  पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक बारामती श्री. आनंद भोईटे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग
बारामती श्री. गणेश इंगळे  यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment