गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना केले तडीपार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 22, 2023

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना केले तडीपार..

गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना
केले तडीपार..
बारामती:-आगामी गणेश उत्सव, नवरात्री हे सन शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीसांनी बारामती शहरातील रेकॉर्ड वरील गुन्हे गार तसेच सार्वजनिक शांतता भंग करणारे उपद्रवी यांची यादी तयार केलेली असून त्यांचे
विरूद्ध मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन वारामती शहर पोलीसांनी आखलेले असून असे काही उपद्रवी इसम असतील त्यांची नावे सुद्धा पोलीस स्टेशनला कळविण्यात वावत पोलीसांनी नागरीकांना अहवान केले आहे.
त्याबाबत बारामती शहरतील १ हर्षद उर्फ हर्षा राजु बागवान रा. आमराई बारामती २. पिन्या उर्फ अमर सुनिल सोनवणे रा. आमराई बारामती ३. अमोल राजू कांबळे रा. आमराई वारामती ४ . ऋतिक उर्फ विधूर मनोज लालबिगे रा.दुर्गा टॉकीज बारामती यांचे विरूद्ध गर्दी मारामारी, चोरी, खंडणी, असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे
दाखल असल्याने त्यांचे विरूद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन मार्फत तडीपार करण्याचा प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना सादर करण्यात आलेला होता त्याचे अवलोकन करून मा. अंकीत गोयल  पोलीस अधिक्षक
पुणे ग्रामीण यांनी इसम नामे१. हर्षद उर्फ हर्षा राजु बागवान रा. आमराई बारामती २. पिन्या उर्फ अमर सुनिल सोनवणे रा. आमराई बारामती ३. अमोल राजू कांवळे रा. आमराई बारामती ४. ऋतिक उर्फ विधूर मनोज लालबिगे रा .दुर्गा टॉकीज बारामती यांना पुणे ग्रामीण जिल्हातील वारामती, पुरंदर, दौंड, इंदापुर, हवेली, पुणे शहर,
पिंपरी चिंचवड व सातार जिल्हातील फलटण तालुका असे त्यांना सहा महिण्यासाठी हददपार करण्यात आलेले आहे.सदर कार्यवाही मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे  यांचे मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस कॉन्स्टेबल अजीत राऊत यांनी सदरची कामगीरी केलेली आहे.

No comments:

Post a Comment