सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना निर्भया पथकानी केले मार्गदर्शन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 9, 2023

सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना निर्भया पथकानी केले मार्गदर्शन..

सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना निर्भया पथकानी केले मार्गदर्शन..                                                                             दौड:-दिनांक 9/09/2023  रोजी माननीय श्री आनंद भोईटे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांचे मार्गदर्शनाखाली अमृता भोईटे महिला पोलीस हवालदार निर्भया पथक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव राजे तालुका दौंड जिल्हा पुणे या शाळेत उपस्थित राहून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना खालील विषयांवर मार्गदर्शन केले  निर्भया पथक,वयात येणाऱ्या मुलींनी घ्यावयाची काळजी,चांगला वाईट स्पर्श,पोक्सो कायदा,स्वसंरक्षण,कायदेविषयक माहिती,पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे,निर्भया पथकाचे ध्येय उद्दिष्ट,तक्रार कोठे कशी द्यावी,अन्याय अत्याचार सहन करू नये,मुलींच्या मनामनापर्यंत पोहोचणे व त्यांना बोलते करणे हा निर्भया पथकाचा उद्देश असून अन्याय सहन करू नका. आई-वडिलांपासून काहीही लपवू नका.शाळेमध्ये येताना जाताना समूहाने या समूहाने जावा.पोलीस,आई वडील,शिक्षक आपले संरक्षण करतात परंतु प्रत्यक्ष वेळ येते त्यावेळी आपण एकटे असतो त्यामुळे आपल्या सुरक्षिततेची आपण काळजी घ्यावी.मुलांनी व्यसनाधिनते कडे वळू नये, वाढलेल्या आत्महत्या, मित्र मैत्रिणी तपासा,संगत, अल्पवाययिन मुलांनी गाड्या चालवू नका,दाखलपात्र गुन्हा नोंद असेल तर सरकारी नोकरी मिळत नाही, शिस्त पाळा, बोला तक्रार देणेस पुढे या,अनावश्यक इतरत्र एकटे फिरू नये.गरज भासल्यास स्थानिक पोलीस स्टेशन,निर्भया पथक,डायल 112 यांची मदत घ्यावी. मुलींची व महिलांची सुरक्षितता व छेडछाडीस प्रतिबंध करणे हे निर्भया पथकाचे मुख्य उद्दिष्ट असून ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत तरी छेडछाडीचे प्रकार सहन करू नका तक्रार द्या.कोणालाही घाबरण्याची गरज नाही.निर्भया पथक मुलींच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले.अशी माहिती सौ.अमृता प्रवीण भोईटे महिला पोलीस हवालदार निर्भया पथक,भरोसा सेल, महिला समुपदेशन कक्ष अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती यांनी दिली.

No comments:

Post a Comment