धोकादायक...का होतोय बारामतीकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार; दूध भेसळ, बोगस रॅमिडिसिव्हर इंजेक्शन नंतर आत्ता घातक इंजेक्शन विक्रीचा व्यवसाय... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 23, 2023

धोकादायक...का होतोय बारामतीकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार; दूध भेसळ, बोगस रॅमिडिसिव्हर इंजेक्शन नंतर आत्ता घातक इंजेक्शन विक्रीचा व्यवसाय...

धोकादायक...का होतोय बारामतीकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार; दूध भेसळ, बोगस रॅमिडिसिव्हर इंजेक्शन नंतर आत्ता घातक इंजेक्शन विक्रीचा व्यवसाय... 
बारामती:-राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपण खऱ्या अर्थाने बारामतीकरांच्या जीवानिशी खेळणाऱ्या लोकांना कडक शासन व्हावे यासाठी काही प्रयत्न करणार का?कारण विरोधी पक्ष नेता असताना आपण विधानसभेत महत्त्वाचे स्टेटमेंट दिलं होतं त्याची अंमलबजावणी होईल का?कारण दूध भेसळ, बोगस रॅमिडिसिव्हर इंजेक्शन व आत्ता घातक इंजेक्शन यासारखे विषारी व घातक वस्तूची विक्री सुरू होती, नुकताच बारामतीमध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक केल्याची माहिती पुढे आली आहे,याबाबत पोलीस प्रशासनाचे कौतुक करावे तेवढे थोडेच  बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि इसम नामे याने आपलेकडे काही मिफेनटरमीन ( MEPHENTERMINE ) हे मानवी शरीरास घातक इंजेक्शन मिफेनटरमीन ( MEPHENTERMINE ) नावाचे १२ इंजेक्शन जवळ बाळगले असल्याचे निर्दशनास आले याप्रकरणी इसमास अटक झाली,सदर अटक इसमाकडून अशा प्रकारचे घातक इंजेक्शन विकणाऱ्या लोकांची नांवे पुढे येतील अशी शक्यता आहे असे पोलीस प्रशासन सांगत आहे. त्यात शहरातील काही जीमचे चालक व इतरही काही बडे मासे गळ्याला लागण्याची शक्यता आहे.सदरबाबत अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक यांनी सांगितले की, सदर इंजेक्शनचा उपयोग हृदयविकाराचे आजारामध्ये केला जातो. परंतू सध्या सदर इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले ही व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असल्याची सांगितले आहे. तसेच सदर इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे,किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत आहे.अशा प्रकारे बेकायदेशिरपणे इंजेक्शन बाळगणाऱ्या इसमाबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ
पोलीस स्टेशनला कळविणेबाबत पोलिसांनी आवाहनही केले आहे.पण याआधी सुद्धा बारामतीत दूध भेसळ, रॅमिडिसिव्हर इंजेक्शन या सारखे घातक गोष्टींमुळे जीव धोक्यात गेल्याचे प्रकार उघड झाले आहे,मध्यतरी बारामती तालुक्यात दूध भेसळीचे रैकेट असल्याचे समजल्याने दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. दूध भेसळ करुन सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना अजितदादा पवार यांनी केली होती.त्यानंतर देखील बारामतीत बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बारामतीत समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजारामुळे खळबळ उडाली
असताना बनावट औषध रुग्णांच्या जीवावर उठत
असल्याचं समोर आलं होतं.पुन्हा बारामतीत घातक इंजेक्शन विक्री गेल्या अनेक वर्षांपासून चालू असल्याचे समजते तर यामध्ये अनेक तरुण बळी पडले असून यातूनच संगतीने व याला बळी पडत युवकाचा जीव गेल्याचे कळतंय,सदर इंजेक्शनचा उपयोग तरुण मुले ही व्यायाम करुन बॉडी बिल्डींगसाठी व व्यसन म्हणून करत असतात तर  इंजेक्शनमुळे कायमस्वरुपी तंद्री लागणे, ब्लड प्रेशर जास्त राहणे,किडनी निकामी होणे असे दुष्परिणाम होत असल्याने अनेक युवक या मोहापायी अडकले असून त्यांना हे घातक इंजेक्शन कोण पुरवितोय?बारामतीत हे इंजेक्शन कुठून येतंय, यामध्ये कोण्या मोठ्या व्यक्तीचा हात आहे का?अश्या कृत्याला कोणी पाठीशी घालतय का?असे अनेक प्रश्न सद्या उपस्थित होत असताना दिसत आहे याकामी पोलीस कसून तपास करून सूत्रधार शोधून काढतील का?यामध्ये किती जण सहभागी असतील याचा प्रामाणिक शोध घेतला जाईल का?अशी चर्चा सद्या बारामतीत होताना दिसत आहे.याबाबत आणखी काही माहिती लवकरच प्रसारित करणार आहोत.

No comments:

Post a Comment