बारामती सहकारी बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 23, 2023

बारामती सहकारी बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..

बारामती सहकारी बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
बारामती:-बारामती सहकारी बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. राजमाता जिजाऊ सभागृह बारामती येथे मा. ना. श्री. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र
राज्य यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी केले. अहवाल वर्षात बँकेच्या ठेवी रु. २२२२.१० कोटी व कर्जवाटप रु. १४०६.३२ कोटी पर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेचा शाखाविस्तार अहवाल वर्षात ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष असा झाला आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. बँकेस अहवाल वर्षात
रिझर्व बँकेच्या नियमानुसार एन.पी.ए.व इतर आयकराच्या व जाता बँकेस रु. ८.४५ कोटी इतका निव्वळ नफा झालेला असून बँकेचे १९७६४ सभासद असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बँक आपल्या ग्राहकांना यु.पी.आय., आर.टी.जी.एस., नेफ्ट,ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पैनकार्ड काढून देणे, मोबाईल बँकिंग, एसएमएस बँकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट सुविधा,विमा सेवा, वीज बिल भरणा सुविधा इ. सुविधा देत असल्याचे सांगितले.तसेच बँकेची वसुली प्रक्रीया वेगाने सुरु असून आगामी हवाल लात बँकेचा एन. पी.ए. तीन टक्के चे आत आणण्यासाठी मा. दादांच्या मार्गदर्शनाखाली व सभासदांच्या सहकार्याने अधिक प्रमाणावर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करू असे ते म्हणाले.
सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांनी विषयपत्रिका वाचून व बँकेचा अहवाल वाचून सुरु केले. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले.या वेळी बँकेने प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी केल्याबद्दल मा. अजितदादांनी समाधान व्यक्त केले. रिझर्व बँकेच्या नियमानुसार कर्जवाटप करण्यात यावे तसेच वसुलीबाबतही दादांनी मार्गदर्शन केले.सध्या रिझर्व बँकेने नागरी बँकांना मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. केंद्रीय सहकार मंत्री श्री. अमित शहा हे देखील सहकारातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रिझर्व बँकेचे
गव्हर्नर श्री. शक्तीकांत दास हे सहकारी बँकांच्या प्रतिनिधींशी भेटून चर्चा करून अडचणी सोडवणूक करीत आहेत. त्यामुळे सध्या नागरी बँकांसाठी सकारात्मक वातावरण असल्याचे दादांनी बोलताना सांगितले.या सभेस प्रा. ज्ञानदेव बुरुंगले सर, ॲड. करीमभाई बागवान, श्री. सुर्यकांतशेठ गादिया, श्री.प्रभाकर बर्डे, श्री. बाबुराव कारंडे या सभासदांनी आपल्या सूचना सभेपुढे मांडल्या.या सभेस अॅड. श्री. ए. व्ही. प्रभुणे, उपाध्यक्ष विद्या प्रतिष्ठान, श्री. संभाजी होळकर अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस, श्री. प्रशांत काटे अध्यक्ष छत्रपती सह. साखर कारखाना, श्री. विश्वासराव देवकाते
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, श्री. जय पाटील अध्यक्ष बारामती शहर रा. कॉ. पार्टी, श्री. योगेश जगताप संचालक माळेगाव सह. सा. कारखाना, श्री. सुरेशराव देवकाते संचालक माळेगाव सह. सा. कारखाना,श्री. अरविंद जगताप श्री. दिलीपराव ढवाण पाटील यांसह अनेक मान्यवर, व्यापारी, प्रतिष्ठीत सभासद सभेस हजर होते.
तसेच या सभेस बँकेचे उपाध्यक्ष श्री. किशोर मेहता, श्री. रोहित घनवट, श्री. देवेंद्र शिर्के, श्री. अॅड. शिरीष कुलकर्णी, श्री. उध्दवराव गावडे, श्री. विजयराव गालिंदे, श्री. नामदेवराव तुपे, श्री. मंदार सिकची,श्री. डॉ. सौरभ मुथा,, श्री. जयंत किकले, श्री. रणजीत धुमाळ, संचालिका सौ. नुपूर शहा, डॉ. वंदना पोतेकर, सौ. कल्पना शिंदे तज्ञ संचालक श्री. प्रितम पहाडे (सी.ए.) यांसह माजी संचालक मंडळ सदस्य,व्यवस्थापन मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक श्री. रवींद्र बनकर, मुख्य सरव्यवस्थापक श्री. विनोद रावळ
व त्यांचे सहकारी सेवक वर्ग उपस्थित होते.
सभेचा समारोप बँकेचे उपाध्यक्ष श्री. किशोर मेहता यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

No comments:

Post a Comment