बापरे.. शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर होणार कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 10, 2023

बापरे.. शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर होणार कारवाई..

बापरे.. शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर होणार कारवाई..  
मुंबई:-कर्तव्यचुकारअधिकारी व कर्मचारी यांच्या साठी  ९ वर्षांपूर्वी आदेश काढलेला असूनही त्याचे पालन न करणारे कर्तव्यचुकार शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सर्रास आपल्याला कार्यालयात वावरताना दिसतात, अधिकारी कोण? कर्मचारी कोण?व एजंट कोण हेच कळत नाही त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांची चांगलीच धांदल उडते शासकीय कार्यालयात असतांना ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
याविषयीचा आदेश ७ मे २०१४ या दिवशी राज्यशासनाने परिपत्रकाद्वारे दिला आहे; मात्र अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ओळखपत्र दर्शनी भागात लावत नाहीत.
त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखता न आल्याने अडचण येते.त्यामुळे १० ऑक्टोबर या दिवशी शासन आदेश काढून याविषयी कार्यवाही न करणाऱ्यांवर कारवाईचा आदेश शासनाने
दिला आहे. ओळखपत्र दर्शनी भागात न लावणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नावे सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना या आदेशात देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment