जबरदस्तीने महिलेकडून मोबाईल व मनी मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई..
बारामती:-बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे बारामती तालुका पो.स्टे.गु.र.नं.590/23 भादवी कलम.394,34 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा उघडकीस आणणे कामे वरिष्ठांनी आदेश दिले होते.त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याची माहिती घेऊन.सदरचे गुन्ह्याबद्दल गोपनीय बातमीदार यांचेकडून महिती घेऊन सदरचा गुन्हा हा राजकुमार मुंडा राहणार नक्षत्र गार्डन शेजारी सूर्यनगरी बारामती. याने केला असून सदरचा इसम हा दादा पाटील नगर तांदुळवाडी येथे कन्ट्रक्शन चे मजुरीचे काम करत आहे. अशी गोपनीय माहिती मिळालेने सदरची माहिती माननीय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना कळवून त्यांनी कारवाई करणे बाबत आदेशित केल्याने सदर ठिकाणी जाऊन सदरील इसमास ओळखून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राजकुमार अकलू मुंडा वय 22 वर्ष मूळ राहणार घागरा थाना - गोला जिल्हा - कोरांबे रामगड राज्य - झारखंड हल्ली राहणार- नक्षत्र गार्डन शेजारी सूर्यनगरी बारामती. असे सांगितले त्याने दिनांक 17/8/2023 रोजी रात्री 23/30 वाजण्याच्या सुमारास लीला रेसिडेन्सी सूर्यनगरी बारामती येथे जबरदस्तीने एका महिलेकडून मोबाईल व मनी मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचे कबूल केलेने. त्याच्याकडून सदर गून्ह्यातील मोबाईल, व मनी मंगळसूत्र पंचनाम्याने जप्त करुन घेऊन. त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई करणे कामी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून गुन्ह्याचा अधिक तपास पोसई माळी ,बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री .अंकित गोयल सो,अप्पर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे,पोलीस उपअधीक्षक श्री.गणेश इंगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पो.निरिक्षक कुलदीप संकपाळ,पो.स.ई अमित सिदपाटील,सहा.फौ. बाळासाहेब कारंडे,पो हवा राजू मोमीन,पो.हवा. अभिजीत एकशिंगे,पो.हवा. स्वप्निल अहिवळे,पो.हवा. अतुल डेरे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment