स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई यवत पोलिस स्टेशन येथिल जबरी चोरी चा गुन्हा उघडकीस.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, October 4, 2023

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई यवत पोलिस स्टेशन येथिल जबरी चोरी चा गुन्हा उघडकीस..

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची  कारवाई  यवत पोलिस स्टेशन येथिल जबरी चोरी चा गुन्हा उघडकीस..
बारामती:- दिनांक 3/10/2023 रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की यवत पोस्टे गु.र. नंबर 1289/23 भादवी क 394,34 मधील चोरीस गेलेला मोबाईल हा इसम नामे निलेश गोरे याचेकडे असून तो त्याचे साथीदारासह वरवंड येथील पूला जवळ येणार असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर सो यांना कळवून त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही पोलीस स्टाफ सह वरवंड पुला जवळ जावुन सापळा रचून थांबलो असता दोन ईसम मोटरसायकल वरून येताना दिसले. त्यापैकी मोटरसायकल चालवणारा निलेश गोरे असल्याची खात्री झाल्याने दोघांना ताब्यात घेऊन नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) निलेश गणेश गोरे वय 22 वर्षे राहणार खंडोबा नगर बारामती 2) आकाश दत्ता सोनवणे वय 22 वर्षे राहणार बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे असे सांगितले त्यानंतर दोघांची झडती घेतली असता निलेश गोरे यांच्याकडे MI कंपनीचा मोबाईल मिळून आला त्याचा IMEI चेक केला असता तो यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मोबाईलशी मिळता जुळता असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांनी  भिगवन पो.स्टे.गु.र.नं.538/23 भादवी कलम.392,34 हा गुन्हा सुद्धा केल्याचे कबुली दिली आहे,त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून   पुढील कारवाई करणे कामी यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून गुन्ह्याचा अधिक तपास पोसई नागरगोजे, यवत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
          सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री .अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक श्री.स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पो निरीक्षक राहुल गावडे, सहा.पो.निरिक्षक कुलदीप संकपाळ,सहा.फौ. बाळासाहेब कारंडे,पो.हवा.सचिन घाडगे,पो हवा अजित भुजबळ,पो.हवा.असिफ शेख,पो.हवा.अजय घुले,
पो हवा राजू मोमीन,पो.हवा.अभिजीत एकशिंगे,
पो.हवा. स्वप्निल अहिवळे,पो.हवा.अतुल डेरे,पो.ना. निलेश शिंदे,सहा.फौ मुकुंद कदम 
यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment