मेडिकल कॉलेज रोड ते मेहता हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार घडतायेत अपघात;स्पीड ब्रेकर ची मागणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 2, 2023

मेडिकल कॉलेज रोड ते मेहता हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार घडतायेत अपघात;स्पीड ब्रेकर ची मागणी..

मेडिकल कॉलेज रोड ते मेहता हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार घडतायेत अपघात;स्पीड ब्रेकर ची मागणी..
बारामती:-बारामती विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना यातील भाग म्हणून रस्तेची कामे चालू असून ही रस्ते चकाचक केले आहे मात्र अपघाताचे प्रमाण देखील वाढले हे विसरून चालणार याला यासाठी स्पीड ब्रेकर हवेत पण ते दुर्गा टॉकीज रोड ते खंडोबा नगर रोडवर आहे असे नको तर व्यवस्थित हवे जेणे करून वाहन चालकांना गाडी कंट्रोल करता येईल त्याबरोबरच वाहन चालकांनी देखील वाहन चालवताना गाडी चा स्पीड कमी ठेवावा अशीही मते व्यक्त होत आहे,मेडिकल कॉलेज रोड वर भरधाव वेगाने वाहने देखील धावत असतात त्यामुळे स्पीड ब्रेकर याठिकाणी हवाच अशी मागणी होत आहे  रविवार दि. 1/9/2023 रोजी दुपारी 2 -30 वा मेडिकल कॉलेज नविन रोडवर कार व मोटार सायकल यांचा गंभीर अपघात झाला आहे या रोडवर एका महिनाभरात चार अपघात झाले आहेत याची शासन दखल घेतील काय की या रस्त्यावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नेहमी विकास कामे पाहण्यासाठी ये जा करीत असतात त्यांना या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नाही याची कल्पना नसावी की काय की याबद्दल कोणी सांगितले नसावे असो जवळच महिला हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज आहे येथे सतत अंबुलन्स सिरीयस पेशंट घेऊन येत असल्याने कदाचित स्पीड ब्रेकर बसविलेला नसेलही पण इतर सर्व सामान्य नागरिकांना स्पीड ब्रेकर नसल्याचे अनेकांना नाहक बळी जावं लागत असून अनेक अपघात सतत होत असतात कारण या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे याकडे प्रशासन कधी लक्ष देईल की अजून अपघात घडण्याचे वाट पाहणार आहे अशी प्रतिक्रिया अपघाताला सामोरे जाणाऱ्या जखमी झालेल्या नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून तात्काळ या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकावा अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment