धक्कादायक.. डेटिंग अँपवर मैत्री करुन तरुणांना लॉजवर बोलून तरुणीचं कांड ! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

धक्कादायक.. डेटिंग अँपवर मैत्री करुन तरुणांना लॉजवर बोलून तरुणीचं कांड !

धक्कादायक.. डेटिंग अँपवर मैत्री करुन तरुणांना लॉजवर बोलून तरुणीचं कांड !
पुणे:-सौंदर्याचा वापर करून तरुणी कोणत्या थराला जातील काही नेम नाही, सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. आता तर धक्कादायक घटना समोर आली आहे, एका डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणीने अनेक तरुणांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 'माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?' असं दरवेळी नाव बदलून ही तरुणी अनेकांना मेसेज पाठवते.त्यापैकी काहींना तिने हॉटेलमध्ये बोलावून लुटलं आहे. तिने पुण्यातही काही तरुणांची फसवणूक केली आहे. ती आपल्या सौंदर्याचा वापर करून या तरुणांना लुटत होती,पण अखेर तिचा खेळ संपला आहे, कारण एका तरुणाला लुटायला गेलेली ही तरुणी पोलिसांच्या तावडीत सापडली. तरुणीने पुण्यात कशी केली तरुणांची फसवणूक याबाबत मिळालेली माहितीनुसार पुणे येथे राहणारा 36 वर्षीय रोहित (नाव बदलले आहे)याने 21 सप्टेंबर रोजी सीकिंग ॲडव्हेंचर या डेटिंग अॅपद्वारे
या तरुणीशी बोलणं सुरू केलं. गप्पा वाढल्यानंतर दोघेही टेलिग्रामवर संपर्कात आले. मुलीने तिचा अतिशय सेक्सी फोटो रोहितला पाठवला. थोडं बोलणं झाल्यावर तरुणीने
रोहितला हॉटेल बुक करण्यास सांगितलं. रोहितने
पुण्यातील नऱ्हे इथं हॉटेलमध्ये 302 क्रमांकाची रूम बुक केली. रोहित वेळेवर तिथे पोहोचला आणि मुलगीही तिथे आली. दोघेही खोलीत एकत्र होते. रोहितला खूप आनंद झाला, पण आता त्याच्याबरोबर काय होणार हे त्याला
माहीत नव्हते. या मुलीने रोहितला हॉटेलच्या खोलीतच 12 हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, रोहितने पैसे ट्रान्सफर केले, नंतर दोघांमधील जवळीक वाढली. मग या मुलीने पुन्हा 38 हजार रुपयांची मागणी केली. यावेळी
रोहितने पैसे देण्यास नकार दिला. तेवढ्यात मुलीने फोन करून तिच्या एका मित्राला बोलावलं. खोलीतच रोहितला मारहाण करण्यात आली. त्याचे सर्व पैसे, सोन्याच्या अंगठ्या आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या आणि त्यानंतर तरुणी तिच्या साथीदारासह पळून गेली. डेटिंग अॅपद्वारे हॉटेलमध्ये बोलवून लुटलं
पुण्यातील चंदननगर भागात अंशुल (नाव बदलले आहे) नावाच्या आणखी एका तरुणाने गुन्हा दाखल केला आहे.अंशुलच्या बाबतीतही असंच घडलं, तरुणीने अॅडव्हेंचर सीकिंग या डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री केली. त्याला
हॉटेलच्या रूममध्ये सेक्ससाठी बोलावून नंतर तिच्या पार्टनरला बोलावून हॉटेलच्या रूममध्येच अंशुलला लुटलं.ती याच स्टाइलने तरुणांना लुटत आहे. आधी सौंदर्याची भुरळ घालून तरुणांना फसवायचं आणि नंतर अशा पद्धतीने लुटायचं. डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री,टेलिग्रामद्वारे फोटो पाठवून नंतर हॉटेलमध्ये बोलवून ती
तरुणांना लुटते.मुंबईतून पोलिसांनी केली तरुणीला अटक पुणे पोलीस या मुलीचा शोध घेत होते. पुण्यातील या तरुणीने इथेच नव्हे तर मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अनेकांना फसवल्याचं समोर आलंय.एकदा डेटिंग अॅपद्वारे कोणीतरी तिच्याशी संपर्क साधला की ती त्याच्याकडून पैसे लुटते. पोलीस या तरुणीचा बराच वेळ शोध घेत होते. आता अखेर पोलिसांचा शोध संपलाय. अशीच कोणाला तरी फसवण्यासाठी ही तरुणी मुंबईला गेली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी
तातडीने छापेमारी केली आणि तिला अटक करण्यात आली. या तरुणीशिवाय तिचा साथीदार नितेश नवीन सिंह यालाही अटक करण्यात आली आहे. नितेश हा बिहारचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी मिळून अशा प्रकारे अनेकांना लुटले होते. या दोघांनी फसवणूक केलेल्या इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. लुटलेले सोन्याचे दागिने आणि रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment