पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय कंत्राटी कर्मचारी यांच्या हक्कासाठी बारामतीत उपोषण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, November 1, 2023

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय कंत्राटी कर्मचारी यांच्या हक्कासाठी बारामतीत उपोषण..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय 
कंत्राटी कर्मचारी यांच्या हक्कासाठी बारामतीत उपोषण..
बारामती:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या.तसेच कर्मचारी व कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोफत उपचार रुग्णालयात मिळावा.अशी मागणी कर्मचारी यांची आहे.सदर मागणीसाठी भारतीय युवा पँथर संघटना रुग्णालयासमोर उपोषण करणार आहे.सदर उपोषणात कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.
जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत उपोषण कर्मचारी करणार असे कर्मचारी यांनी सांगितले.उपोषणाबाबत  पत्र व्यवहार कर्मचाऱ्यांनी केला आहे.भारतीय युवा पँथर संघटना कर्मचारी यांच्यासाठी लढा देत राहणार आहे.
काल कंत्राटी कर्मचारी प्रशासकीय आधिकारी यांना निवेदन देत असताना त्यांनी सांगितले की आम्ही ठेकेदाराला बोलणार तुम्ही पत्र आवक जावक विभागाला द्या.तुम्ही कर्मचारी यांचे भावनांचा आदर केला नाही.त्यावेळेस तुम्ही हे विसरले की हे  कर्मचारी एवढ्या कमी वेतनात काम करतात. कर्मचाऱ्यांना काम करताना सुरक्षेचे  आवश्यक साहित्य दिले जात नाही तरी ते काम करतात.कंत्राटी कर्मचारी यांचा विषय असेल तेव्हा सगळे नियम कायदे आठवतात.
कंत्राटी कर्मचारी यांच्या सोबत भारतीय युवा पँथर संघटना आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याला ज्या कामासाठी नेमले आहे तेवढेच काम सांगावे लागेल. त्याच्या व्यतिरिक्त काम पण सांगता येणार नाही.
ठेकेदार १० असले तरी असू द्या कर्मचारी सगळे एक झाले ना मगच सर्वांना ताकद समजणार आणि ती वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment