ब्रेकिंग न्यूज..लाचेची मागणी केल्या प्रकरणी तलाठी सह एकास घेतले ताब्यात..
पुणे:-लाचखोरीचे प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे, महसूल विभागात तर आवाचा सव्वा रक्कम खाजगी इसमामार्फत स्वीकारले जात असल्याचे अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या यामध्ये नायब तहसीलदार,मंडल अधिकारी, तलाठी सह कोतवाल यांच्या मार्फत लाचखोरी होत असल्याचे दिसत आहे,नुकताच बक्षीसपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 5 हजार रूपयाची लाच घेताना पुरंदर तालुक्यातील सजा सोनोरीमधील तलाठी आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहेत. तलाठी निलेश सुभाष गद्रे ( 42, पद तलाठी, सजा - सोनोरी ता. पुरंदर, जि.पुणे) आणि (21, रा. वजपुरी,ता. पुरंदर, जि. पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे कळत आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की,तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या आजोबांनी तक्रारदारांना बक्षीसपत्राने 39 गुंठे जमीन दिली होती. सदरील बक्षीसपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज केला
होता. तलाठी निलेश गद्रे यांनी त्यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. दरम्यान,तक्रारदाराने करप्शनकडे तक्रार केली.आरोपी आदित्य कुंभारकर यांनी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रूपयाची लाच तलाठी गद्रे यांच्यासाठी घेतली. अॅन्टी करप्शनच्या पथकाने दोघांना देखील ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment