कॉग्रेसकडे ओबीसी विभागा तर्फे लोकसभेसाठी बारामतीची जागा मिळण्यासाठी विनंती मागणी..
बारामती:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तर्फे 4 जानेवारी ते 4 फेब्रुवारी जातनिह्यात जनगणना रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे सदर यात्रा कोल् हापूर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळापासून सुरू करण्यात येणार असून ही यात्रा साधारण महाराष्ट्र मध्ये 3500 किलोमीटरची असणार आहे या यात्रेच्या शुभारंभ साठी देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अखिल भारतीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन जयसिंग यादव यांनी येण्यास विनंती केली तसेच या यात्रेचे पूर्ण नियोजन आमचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे तसेच या यात्रेला काँग्रेस पक्षाचे आजी माजी मंत्री खासदार आमदार व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहे या यात्रेची सांगता सभा पुणे येथे होणार असून त्यासाठी आमचे लाडके नेते तसेच देशाचे भावी पंतप्रधान राहुल जी गांधी यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यांनी पत्राद्वारे येण्यास विनंती केली आहे करण्यात आले आहे तसेच यावेळी ओबीसी विभागा तर्फे लोकसभेसाठी जागा मागण्यात आल्या व या जागा आग्रहास्तर काँग्रेसने लढवाव्यात व त्याच्यामध्ये ओबीसी विभागाला खालील जागा बारामती, भिवंडी, जालना, अहमदनगर, जळगाव, हिंगोली, सातारा, यवतमाळ, धुळे, माळेगाव देण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना विनंती करण्यात आली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर यांच्याकडून देण्यात आले.
No comments:
Post a Comment