बारामतीचे सुपुत्र दबंग माजी पोलीस अधिकारी महादेवराव बाजीराव काळे यांचे दुःखद निधन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 21, 2023

बारामतीचे सुपुत्र दबंग माजी पोलीस अधिकारी महादेवराव बाजीराव काळे यांचे दुःखद निधन...

बारामतीचे सुपुत्र दबंग माजी  पोलीस अधिकारी महादेवराव बाजीराव काळे यांचे दुःखद निधन...
बारामती:- बारामती नगरीचे सुपुत्र आदरणीय महादेवराव बाजीराव काळे (माजी पोलीस उप अधीक्षक ) यांचे दिनांक 21/11/2023 रोजी दुःखद निधन झाले. तरी तिसरा व दहावा दि 23/11/2023 रोजी. सोनाई निवास, कै बाजीराव काळे नगर या त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या मागे मोठा मुलगा जयकुमार महादेवराव काळे, धाकटा मुलगा ऍडव्होकेट अमर महादेवराव काळे व धाकटी मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. महादेवराव काळे यांनी 35 वर्षे महाराष्ट्र पोलीस खात्यात अनेक पदावर निरनिराळ्या ठिकाणी अधिकारी म्हणून काम केले. सर्व्हिस च्या शेवटी पोलीस उपअधीक्षक म्हणून औरंगाबाद महामार्ग या ठिकाणी सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा शोध लावला होता. उल्लेखनीय म्हणजे जेजुरीच्या खंडिबांची मूर्ती चोरी चा शोध त्यांनीच लावला होता. अशे अनेक खून, दरोडे, बलात्काराच्या गुण्यांचा शोध त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लावून बारामतीकरांची मान उंचावली होती. अत्यंत गरीब कुटुंबातून कष्टाने शिक्षण घेउन ते पोलीस दलात psi पदावरती भरती झाले होते. तरी त्यांच्या जाण्याने संपूर्ण बारामतीतील काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तिसरा व दहावा दि. 23/11/2023 रोजी. सोनाई निवास, कै बाजीराव काळे नगर, बारामती.या त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.

No comments:

Post a Comment