भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्री. खलील काझी यांची सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर..
बारामती :-भाजपचे ज्येष्ठ नेते, पुणे जिल्हा दक्षिण विभाग भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, श्री. खलील काझी.यांचा आज भारतीय जनता पार्टीने श्री. खलील काझी यांना सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची संधी दिली. पक्षाच्या निर्देशानुसार आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य समर्थक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सन १९९५ पासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पक्षाचे काम करत आहेत. व बारामती तालुका भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम करत त्यांनी पक्षाशी आपली निष्ठा कायम ठेवली. २०१४ मध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या शासकीय समितीवर त्यांची नियुक्ती झाली होती.
२०२१ मध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी लक्षवेधी कामगिरी करत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. शेतकरी व सभासदांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क आणि विश्वास यामुळे त्यांची ओळख निर्माण झाली.
पक्षाच्या सातत्यपूर्ण कामाची आणि निष्ठेची पावती म्हणून २०२३ मध्ये पुणे जिल्हा दक्षिण विभाग भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर २०२६ मध्ये पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करून भाजप पक्षाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला.
जवळपास ३० वर्षांचा राजकीय अनुभव, पक्षाशी एकनिष्ठपणा, मजबूत जनसंपर्क आणि सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध ही श्री. खलील इस्माईल काझी यांची प्रमुख ओळख आहे.
पक्षाने वेळोवेळी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत जनसेवा आणि पक्षकार्याची ही वाटचाल आजही अविरत सुरू आहे.
योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी — पक्षाने पुन्हा एकदा श्री. खलील काझी यांच्यावर दाखवलेला विश्वास हा त्यांच्या प्रदीर्घ पक्षनिष्ठेची आणि कार्याची पावती असल्याची चर्चा कार्यकर्ते व जनतेमध्ये आहे.
No comments:
Post a Comment